नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. फारूक अब्दुला यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मते मांडणाऱ्या व्यक्तीला देशद्रोह म्हणू शकत नाही. तसेच फारुख अब्दुल्ला यांच्यावरील आरोप सिद्ध न करू शकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला 50 हजार रुपये दंड ठोठावला. अब्दुला यांनी कलम 370 संदर्भात चीन आणि पाकिस्तानची मदत मागितली होती, असा आरोप याचिकाकर्त्याने केला होता.