ETV Bharat / bharat

Mangla Gauri Vrat Katha : जाणून घ्या मंगळा गौरी व्रत का आहे खास, काय आहे व्रत कथा

श्रावण महिन्याचा अद्भूत महिमा आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असला तरी श्रावण महिन्यात माता पार्वतीच्या पूजेलाही महत्त्व आहे. मंगळागौरीचे व्रत श्रावण मंगळवारी ठेऊन पार्वतीची पूजा करण्याचा विधी आहे.

Mangla Gauri Vrat Katha
मंगळा गौरी व्रत
author img

By

Published : Aug 22, 2023, 2:48 PM IST

हैदराबाद : हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिना सुरू आहे. श्रावण यावेळी अधिक मास असल्याने हा श्रावण २ महिन्यांचा होता. अधिक मास दर 3 वर्षातून एकदा येतो. जरी श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, परंतु श्रावण महिन्यात माता पार्वतीच्या पूजेचे देखील स्वतःचे महत्त्व आहे.

पूजेच्यावेळी कथा वाचली जाते : ज्याप्रमाणे श्रावणाच्या सोमवारी उपवास करून भगवान शंकराची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे श्रावणाच्या मंगळवारी मंगळागौरी व्रत करून माता पार्वतीची पूजा करण्याचा विधी आहे. मंगळा गौरीचे व्रत केल्याने वैवाहिक सुख आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते, अशी आख्यायिका आहे. यासोबतच ज्या मुलींचे लग्न होत नाही त्यांना लवकर योग्य वर मिळतो, असाही समज आहे.. मंगळा गौरीच्या व्रताच्या पूजेच्यावेळी ही कथा वाचली जाते, जाणून घेऊया मंगळा गौरीच्या व्रताची कहाणी...

अशी होती कथा : पौराणिक मान्यतेनुसार धर्मपाल नावाचा एक श्रीमंत सेठ होता आणि त्याला पत्नी होती, सेठ धर्मपालची पत्नी खूप सुंदर होती. त्यांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नव्हती, परंतु धर्मपाल आणि त्यांची पत्नी यांना संतती नसल्यामुळे नेहमीच दुःखी होत. अनेकवर्षे देवाची उपासना केल्यानंतर, देवाच्या कृपेने, धर्मपाल आणि त्यांच्या पत्नीला अपत्यप्राप्ती झाली. परंतु त्यांच्या मुलाला अल्प आयुष्याचा शाप मिळाला. या शापामुळे वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला असता, असे या कथेमध्ये सांगितले आहे.

धरमपालच्या सुनेला अखंड सौभाग्य लाभले : कथेमध्ये पुढे असे म्हटले आहे की, देवाच्या कृपेने धर्मपालच्या मुलाचे वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झाले. धर्मपालच्या मुलाचे ज्या मुलीशी लग्न झाले होते ती मुलगी श्रावण महिन्यात गौरीची पूजा करायची. ती मंगळा गौरीचे व्रत पाळून माँ गौरीची पूजा करायची. त्यामुळे माता पार्वतीने त्या मुलीला अखंड सौभाग्य दिले होते. माता पार्वतीच्या आशीर्वादाने ती मुलगी अभंग झाली आणि तिचा नवरा 100 वर्षे जगला, असे कथेमध्ये पुढे सांगण्यात आले आहे. सर्व विवाहित आणि अविवाहित महिला, मुली माता पार्वतीच्या आनंदासाठी हे व्रत नियमानुसार ठेवतात.

हेही वाचा :

  1. Pradosh Vrat 2023 : आज आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या पूजेच्या शुभ मुहूर्तासह पूजेची पद्धत आणि महत्त्व
  2. Mangla Gauri Vrat Katha : मंगळा गौरी व्रताने अल्पायुषी पतीचे रूपांतर शताब्दीत केले, जाणून घ्या या व्रताची कहाणी
  3. Ravi Pradosh Vrat : रवि प्रदोष व्रताने या ग्रहांचे दोष दूर होतात, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.