रियाध (सौदी अरेबिया) : सौदी अरेबियाच्या ( Saudi Arabia ) हज आणि उमराह मंत्रालयाने सांगितले की, हज यात्रेकरूंची संख्या आणि वय निर्बंध हटवले जाणार आहे.आता हज यात्रेकरूंना कोरोना महामारीच्या आधीप्रमाणेच हज यात्रा करता येणार आहे. 2019 मध्ये सुमारे 2.5 दशलक्ष लोकांनी तीर्थयात्रेत भाग घेतला होता. कोविड-19 साथीच्या आजाराच्या प्रसारामुळे दोन वर्षांसाठी यात्रेकरूंची संख्या कमी करण्यात आली होती. ( Saudi Arabia lifts Restrictions On Number Age limit )
यात्रेकरूंची संख्या वाढणार : सौदीने यात्रेकरूंसाठी वयोमर्यादेवरील निर्बंध काढून टाकले आहे. आता कोरोना पूर्वीप्रमाणेच हज होणार आहे. तौफिक अल-रबियाह म्हणाले, यावर्षी हज यात्रेकरूंची संख्या कोरोनाव्हायरसच्या पूर्वीसारखीच असेल. हज यात्रा ही दरवर्षी होणारा इस्लामिक धार्मिक कार्यक्रम आहे, जो यावर्षी जून महिन्यात होणार आहे. ( Saudi Arabia lifts Restrictions on Hajj Pilgrim )
25 लाख लोकांनी हज यात्रा केली : 2019 मध्ये सुमारे 2.5 दशलक्ष लोकांनी हज यात्रा केली. कोविड-19 साथीच्या आजारामुळे गेल्या दोन वर्षांत ही संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. 2022 मध्ये, सौदी अरेबियाने 18 ते 65 वयोगटातील सुमारे 10 लाख परदेशी यात्रेकरूंना प्रवेश प्रतिबंधित केला. 2019 मध्ये सुमारे 25 लाख लोकांनी हज यात्रा केली होती. पुढील दोन वर्षांत, कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे हज यात्रेकरूंची संख्या मर्यादित होती. यादरम्यान केवळ ६५ वर्षांपर्यंतचे लोकच हज यात्रेला जाऊ शकत होते. तर 2022 मध्ये सुमारे 9 लाख यात्रेकरू हज करण्यासाठी पोहोचले होते, त्यापैकी 7 लाख 80 हजार परदेशी होते.
हज एक्स्पो २०२३ चे उद्घाटन : हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबियाह यांनी हज एक्स्पो २०२३ च्या उद्घाटनादरम्यान घोषणा केली की यावेळी यात्रेकरूंची संख्या साथीच्या आजारापूर्वीप्रमाणे परत येईल. हज आणि उमराह मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते की ज्यांनी यापूर्वी तीर्थयात्रा केली नाही त्यांना यावर्षी नोंदणीसाठी प्राधान्य दिले जाईल.
यावर्षी हजसाठी ऑनलाइन अर्ज सुरू : ( Online application for Hajj started this year ) अलीकडेच 5 जानेवारी रोजी अल-राबियाने सांगितले की आता लोक ऑनलाइन हजसाठी अर्ज करू शकतील. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. यासाठी जुलैच्या मध्यापर्यंत प्रवाशांकडे वैध राष्ट्रीय किंवा रहिवासी ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच धार्मिक स्थळी पोहोचण्याच्या १० दिवस आधी कोरोना आणि फ्लूचे लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हज यात्रेकरू हज मंत्रालयाच्या वेबसाइटवर जाऊन थेट अर्ज करू शकतात. एकच मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जासाठी वापरू नये असे सांगण्यात आले आहे.