पौष महिन्याला (Paush Purnima 2023) हिंदू धर्मात खूप महत्व आहे. हा महिना सुर्याचा महिना म्हणुन देखील ओळखला जातो. पौष पौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान केल्याने भरमसाठ पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदा पौष पौर्णिमा 6 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भाविक चंद्र आणि सुर्याची पूजा करतात. या दोन देवतांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि सर्व मनोकामना (every wish fulfilled by worshipping) पूर्ण होतात, अशी श्रध्दा आहे.
पौष पौर्णिमा मुहूर्त (Paush Purnima 2023 Date) : 6 जानेवारीला येणारी पौष पौर्णिमा ही 2023 सालची पहिली पौर्णिमा आहे. या दिवशी पूजा करण्याचे रिती-रिवाज हे शहर व प्रांतानुसार बदलतात. या दिवशी शास्त्रोक्त पध्दतीने पूजा केल्यास मुनष्याला मोक्ष प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यावेळी पौष पौर्णिमा ही 6 जानेवारीला दुपारी 2 वाजुन 16 मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि 7 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजुन 37 मिनिटांनी संपणार आहे.
सर्वार्थ सिध्दी योग : उगवत्या तिथीनुसार पौष पौर्णिमा 6 जानेवारीला साजरी केली जाईल. यावेळी पौष पौर्णिमेलाही सर्वार्थ सिध्दी योग तयार (sarvartha siddhi yoga) होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. या काळात केलेली सर्व कामे यशस्वी होतात. यावेळी हा योग 7 जानेवारी रोजी रात्री 12 वाजुन 14 मिनिटांनी सुरु होईल आणि सकाळी 7 वाजुन 15 मिनिटांनी संपणार आहे.
पूजेची पध्दत : विधी : पौष पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करुन उपवास करावा. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे, अत्यंत शुभ मानले जाते. नदीमध्ये स्नान करुन सुर्याला अर्ध्य अर्पण करावे. यानंतर भगवान मधुसुदन म्हणजेच श्री कृष्णाची पूजा करतात. तसेच ब्राम्हण किंवा गरजूंना अन्न अर्पण करतात. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. तसेच पाच ब्राह्मणांना भोजन द्यावे. तसेच गूळ, घोंगडी दान करावे. संध्याकाळी दुधात साखर आणि तांदूळ मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. पौष पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि सूर्य देवाची पूजा केल्यास त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
या विधी केल्यास होईल धन प्राप्ती : 6 जानेवारी 2023 रोजी पौष पौर्णिमेला काळ्या मुंग्यांना पिठात साखर मिसळून खाऊ द्या, याने प्रत्येक कार्य सिद्धीस जातात अशी मान्यता आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी माता गजलक्ष्मीची पूजा केल्याने गरीबी दूर होते आणि धम प्राप्ती होते. यासाठी रात्री माता गजलक्ष्मीचे स्मरण करून 'ओम श्री ह्रीं क्लीम गजलक्ष्मीय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा . पौष पौर्णिमेच्या रात्री दक्षिणावर्ती शंखामध्ये गंगेचे पाणी आणि केशर मिसळून घ्या आणि सकाळी त्याने श्री हरी विष्णूला अभिषेक करा. यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ETV BHARAT त्याची पुष्टी करत नाही.)