हैदराबाद Saphala Ekadashi : आज (रविवार, 7 जानेवारी 2024), पौष महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी आहे. या तिथीवर भगवान विष्णूंचा अधिकार आहे असं म्हटलं जातं. हा दिवस नवीन दागिने खरेदी करणे, भगवान विष्णूची पूजा आणि व्रत करणे यासाठी शुभ मानला जातो. आज सफला एकादशीचे व्रतदेखील आहे. दरम्यान, सफला एकादशी 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.41 वाजता सुरू होत आहे. तर एकादशीची वेळ 8 जानेवारी रोजी सकाळी 12.46 वाजता समाप्त होईल.
भगवान विष्णूची पूजा करा : सफला एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान विष्णुंना धूप, दीप, फळं आणि पंचामृत अर्पण करावे. भगवान विष्णूंची पूजा नारळ, सुपारी, आवळा, डाळिंब इत्यादींनी करावी. या दिवशी रात्री जागरण करून श्रीहरिचे नामस्मरण करण्याला मोठं महत्त्व आहे. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करून उपवास सोडावा.
दैनंदिन कामांसाठी योग्य नक्षत्र : आज चंद्र तूळ राशीत आणि विशाखा नक्षत्रात असेल. हे नक्षत्र 20 अंश तूळ ते 3:20 अंश वृश्चिक राशीपर्यंत आहे. त्याचा अधिपती ग्रह बृहस्पति आहे आणि त्याची देवता सत्रागणी आहे, ज्याला इंद्रग्नी असेही म्हणतात. हे संमिश्र स्वरूपाचे नक्षत्र आहे. नक्षत्र नियमित कर्तव्ये पार पाडण्यासाठी, एखाद्याच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या सोपविण्यासाठी, घरगुती कामासाठी आणि दैनंदिन महत्त्वाच्या कोणत्याही कामासाठी योग्य आहे.
- सफला एकादशीच्या दिवशी राहुकाल : आज राहुकाल 16:48 ते 18:09 पर्यंत असेल. अशा स्थितीत कोणतेही शुभ कार्य करायचे असल्यास हा कालावधी टाळणेच योग्य राहील. त्याचप्रमाणे यमगंड, गुलिक, दुमुहूर्त आणि वर्ज्यम हे देखील टाळावे.
- आजचे पंचांग
- विक्रम संवत: 2080
- महिना : पौष
- पक्ष : कृष्ण पक्ष एकादशी
- दिवस: रविवार
- तिथी : कृष्ण पक्ष एकादशी (सफला एकादशी)
- योग: धृती
- नक्षत्र : विशाखा
- करण : बाव
- चंद्र राशी: तूळ (दुपारी 04.02 पर्यंत) त्यानंतर वृश्चिक
- सूर्य राशी: धनु
- सूर्योदय: सकाळी 07:22
- सूर्यास्त: संध्याकाळी 06:09
- चंद्रोदय: पहाटे 03.59 वा
- चंद्रास्त: दुपारी 01.46 वा
- राहुकाल : 16:48 ते 18:09
- यमगंड: 12:45 ते 14:06
हेही वाचा-