चेन्नई Dr S S Badrinath Passes Away : प्रसिद्ध विट्रेओरेटिनल सर्जन आणि शंकर नेत्रालयाचे संस्थापक (Sankara Nethralaya Founder) डॉ. एस एस बद्रीनाथ (Dr SS Badrinath) यांचं मंगळवारी वृद्धापकाळानं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत बद्रीनाथ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय.
-
Deeply saddened by the passing of Dr. SS Badrinath Ji, a visionary, expert in ophthalmology and founder of Sankara Nethralaya. His contributions to eye care and his relentless service to society have left an indelible mark. His work will continue to inspire generations.…
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Deeply saddened by the passing of Dr. SS Badrinath Ji, a visionary, expert in ophthalmology and founder of Sankara Nethralaya. His contributions to eye care and his relentless service to society have left an indelible mark. His work will continue to inspire generations.…
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2023Deeply saddened by the passing of Dr. SS Badrinath Ji, a visionary, expert in ophthalmology and founder of Sankara Nethralaya. His contributions to eye care and his relentless service to society have left an indelible mark. His work will continue to inspire generations.…
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2023
कोण आहेत डॉ. सेंगमेडू श्रीनिवास बद्रीनाथ? : शंकर नेत्रालयाचे संस्थापक डॉ. सेंगमेडू श्रीनिवास बद्रीनाथ यांचं मंगळवारी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. डॉ. बद्रीनाथ हे भारतीय लष्कराचे एक अशासकीय सदस्य होते. त्यांनी सैन्यात नेत्रचिकित्सक म्हणूनही काम केलं होतं. डॉक्टर बद्रीनाथ यांना 1983 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. अन्नामलाई आणि तामिळनाडू डॉ. एमजीआर वैद्यकीय विद्यापीठानं त्यांना 1995 मध्ये मानद डॉक्टरेट दिली होती.
24 फेब्रुवारी 1940 रोजी चेन्नई येथे जन्म : डॉ. एस एस बद्रीनाथ यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1940 रोजी चेन्नई येथे झाला होता. त्यांचे वडील एस.व्ही. श्रीनिवास राव हे अभियंता होते आणि त्यांची आई वकिलाची मुलगी होती. डॉ. बद्रीनाथ लहान असतानाच त्यांचे पालक गमावले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी आयुर्विम्यामधून मिळालेल्या पैशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये करिअरला सुरुवात केली.
शंकर नेत्रालयाची स्थापना 1978 मध्ये झाली : डॉक्टर बद्रीनाथ यांनी 1978 मध्ये इतर डॉक्टरांच्या मदतीनं शंकर नेत्रालयाची स्थापना केली होती. शंकर नेत्रालय हे भारतातील सर्वात मोठे धर्मादाय रुग्णालय होते. त्यामुळं अनेक रुग्णांना या रुग्णालयातील डॉक्टरांनी सेवा दिली आहे.