ETV Bharat / bharat

सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट! पाटणा हायकोर्टाकडून अटक करण्याचे आदेश

गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. (Sahara India) पाटणा उच्च न्यायालयाने सहारा प्रमुखांना आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण रॉय हजर झाले नाहीत.

सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट
सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट
author img

By

Published : May 13, 2022, 12:18 PM IST

पटना - सहारा इंडियाचे मालक सुब्रत रॉय यांना पाटणा उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलो होते. मात्र, ते आजही हजर झाले नाहीत. आता न्यायालयाने सुब्रत राय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच, पाटणा उच्च न्यायालयाने बिहार, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या डीजीपींना सुब्रत राय यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. (Patna High Court) कोर्टाने सुब्रत रॉय यांना आज सकाळी 10:30 वाजता प्रत्यक्ष सहारा येथे येण्यास सांगितले होते. जर तो आले नाही तर त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले जाईल, असेही कोर्टाने सांगितले होते. मात्र आजही ते हजर राहीले नाहीत. आता या प्रकरणावर 17 मे रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सहारा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक सुब्रत राय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून 27 एप्रिल 2022 रोजी त्यांच्या न्यायालयात हजर राहण्याच्या पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले. न्यायालयाने आज स्पष्ट केले की, 13 मे रोजी सकाळी 10:30 वाजता न्यायालयात हजर होणार होते.

गेल्या सुनावणीत न्यायालयाने सहारा कंपनीला सहारा कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी जमा केलेले बिहारमधील गरीब जनतेचे कष्टाचे पैसे त्यांना लवकरात लवकर कसे परत केले जातील, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. सुनावणीदरम्यान सहाराची बाजू ज्येष्ठ वकील उमेश प्रसाद सिंग यांनी मांडली.

याआधीच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, जर सहारा कंपनीने 27 एप्रिलपर्यंत न्यायालयाला स्पष्टपणे माहिती दिली नाही, तर उच्च न्यायालय या प्रकरणी योग्य तो आदेश देईल, जेणेकरून गुंतवणूकदारांचे पैसे त्यांना परत करता येतील. 27 एप्रिल रोजी पाटणा उच्च न्यायालयाने सहारा ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक सुब्रत रॉय यांना सहारा इंडियाच्या विविध योजनांमध्ये ग्राहकांनी जमा केलेल्या रकमेच्या भरणाबाबत 11 मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा - Sharad Pawar : पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाही : शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.