नवी दिल्ली : देशातील शहरी आणि तरुण मतदारांमध्ये मतदानाप्रती नेहमीच उदासीनता पाहायला मिळते. त्यामुळे त्यांच्यात मतदानाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती केली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा आणि २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सचिनला निवडणूक आयोगाचा 'नॅशनल आयकॉन' बनवण्यात आले आहे.
सचिन आणि आयोगात तीन वर्षांचा करार : सचिन तेंडुलकर आणि निवडणूक आयोग यांच्यात एका सामंजस्य करार झाला. या तीन वर्षांच्या करारांतर्गत, सचिन मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणार आहे. यावेळी बोलताना, 'भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून, आपला मतदानाचा हक्क बजावणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे', असे सचिन म्हणाला.
मतदानाचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न : मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे, तसेच त्यांना मतदान करण्यास प्रोत्साहित करणे निवडणूक आयोगासाठी कठीण काम असल्याचे निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी सांगितले. मात्र आता सचिन तेंडुलकर ही कामगिरी योग्य रित्या पार पाडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी सांगितले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 67 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अजून खूप काही करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उत्कृष्ट सुविधा उपलब्ध असूनही काही भागात कमी मतदान झाल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी अनेक दिग्गजांची नियुक्ती केली होती : शहरी आणि तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत उदासीनता हे काही शहरांमध्ये कमी मतदानाचे प्रमुख कारण असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आयोग विविध क्षेत्रातील नामवंतांना आपले 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्त करत आहे. गेल्यावर्षी आयोगाने लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठीची 'नॅशनल आयकॉन' म्हणून नियुक्ती केली होती. तसेच महेंद्रसिंह धोनी, आमिर खान आणि मेरी कोम सारखे दिग्गज 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाचे 'नॅशनल आयकॉन' होते.
-
Master Blaster, Cricket Legend & Bharat Ratna Awardee #SachinTendulkar
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) August 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
will begin a new innings tomorrow in his role as National Icon for the Election Commission.
Details : https://t.co/FPT6fSpFgP pic.twitter.com/OAJmXJ8qQO
">Master Blaster, Cricket Legend & Bharat Ratna Awardee #SachinTendulkar
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) August 22, 2023
will begin a new innings tomorrow in his role as National Icon for the Election Commission.
Details : https://t.co/FPT6fSpFgP pic.twitter.com/OAJmXJ8qQOMaster Blaster, Cricket Legend & Bharat Ratna Awardee #SachinTendulkar
— Spokesperson ECI (@SpokespersonECI) August 22, 2023
will begin a new innings tomorrow in his role as National Icon for the Election Commission.
Details : https://t.co/FPT6fSpFgP pic.twitter.com/OAJmXJ8qQO
हेही वाचा :