नवी दिल्ली : RPF Recruitment 2024 सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डानं रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये (RPF) कॉन्स्टेबल तसंच उपनिरीक्षक पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्यास इच्छुक, पात्र उमेदवारांना https://rpf.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
कर्मचारी आणि अधिकारी पदाची होणार भरती : RRB द्वारे आयोजित या भरतीद्वारे, रेल्वे संरक्षण दलात सुमारे 2 हजार 250 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलच्या 2 हजार पदांचा समावेश आहे, तर उपनिरीक्षकाची 250 पदे भरण्यात येणार आहेत. अधिसूचना जारी झाल्यानंतरच अधिक माहिती उपलब्ध होणार आहे.
RPF भरतीसाठी वयोमर्यादा : RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 18 ते 25 वर्षे वयोगटातील असावेत. तर उपनिरीक्षक पदांसाठी 20 ते 25 वर्षे वयाची अट आहे. मात्र, राखीव श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांच्या पडताळणी आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. याशिवाय, उपनिरीक्षक पदांसाठी पदवी आवश्यक आहे. पुरुष, महिला दोन्ही उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. मात्र, या भरतीशी संबंधित तपशीलवार अधिसूचना अद्याप जारी केलेली नाही. अधिसूचना प्रकाशनानंतर, भरतीशी संबंधित तपशील जसं, की अर्जाच्या तारखा, पात्रता इ. बद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचवी, त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्यासाठी अर्ज करावा. चुकीचा भरलेला अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
हेही वाचा -