वाराणसी Road Accident in Varanasi : उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व नागरिक पिलीभीत येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येतय. या अपघातात केवळ तीन वर्षांचा मुलगा बचावला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघातावर शोक व्यक्त केलाय.
-
Uttar Pradesh | Eight people lost their lives in an accident between a car and a truck at 7 am today under the Phupur Police Station area in Varanasi. Only a three-year-old child could be saved: Phupur SHO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttar Pradesh | Eight people lost their lives in an accident between a car and a truck at 7 am today under the Phupur Police Station area in Varanasi. Only a three-year-old child could be saved: Phupur SHO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2023Uttar Pradesh | Eight people lost their lives in an accident between a car and a truck at 7 am today under the Phupur Police Station area in Varanasi. Only a three-year-old child could be saved: Phupur SHO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2023
कार आणि ट्रकची धडक : या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारखियांव इथं अर्टिगा कारची ट्रकला धडक बसल्यानं हा अपघात झालाय. सकाळी ७ वाजेच्या सुमारात हा अपघात झालाय. कार आणि ट्रकमधील धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झालाय. अपघातातील मृत नागरिक पिलीभीत इथले रहिवासी आहेत. हे सर्वजण वाराणसीतून देवदर्शन करुन परतत असताना कारला भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत.
-
मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने जनपद वाराणसी में सड़क दुर्घटना में हुई जनहानि पर गहरा दुःख प्रकट किया है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) October 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
महाराज जी ने जिला प्रशासन के अधिकारियों को घायलों के समुचित उपचार हेतु निर्देशित किया है।
महाराज जी ने बाबा विश्वनाथ से दिवंगत आत्माओं की शांति एवं घायलों के…
">मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने जनपद वाराणसी में सड़क दुर्घटना में हुई जनहानि पर गहरा दुःख प्रकट किया है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) October 4, 2023
महाराज जी ने जिला प्रशासन के अधिकारियों को घायलों के समुचित उपचार हेतु निर्देशित किया है।
महाराज जी ने बाबा विश्वनाथ से दिवंगत आत्माओं की शांति एवं घायलों के…मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी महाराज ने जनपद वाराणसी में सड़क दुर्घटना में हुई जनहानि पर गहरा दुःख प्रकट किया है।
— Yogi Adityanath Office (@myogioffice) October 4, 2023
महाराज जी ने जिला प्रशासन के अधिकारियों को घायलों के समुचित उपचार हेतु निर्देशित किया है।
महाराज जी ने बाबा विश्वनाथ से दिवंगत आत्माओं की शांति एवं घायलों के…
मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरु : या अपघातात रुद्रपूरचे रहिवासी असलेले विपिन यादव आणि त्यांची आई गंगा यादव, पिलीभीतच्या पुरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी या दोघांची मृतांमध्ये ओळख पटली आहे. रुद्रपूर येथील महेंद्र वर्मा आणि त्यांची पत्नी, कुटुंबासह दर्शन आणि पूजा करण्यासाठी आले होते. पुरणपूरच्या धर्मा मगधरपूर येथील रहिवासी राजेंद्र यादव यांचाही मृत्यू झालाय. इतर लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त : अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलंय की, मुख्यमंत्री योगी यांनी वाराणसी जिल्ह्यातील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना चांगले उपचार देण्यास सांगितले आहे. त्यांनी बाबा विश्वनाथ यांच्याकडं मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा :