पटना: बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. या वेळी त्यांची चर्चा बिहार पेक्षा महाराष्ट्रात जास्त होत आहे. महाराष्टाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची तुलना राबडी देवींसोबत करण्यात आली आहे. या नंतर वाद वाढला महाराष्ट्रा पाठाेपाठ बिहारमधे पोचला (Marathi Rabri Devi Controversy in Bihar) असुन राजदने चांगलाच समाचार घेतला आहे.
बिहारच्या मुख्यमंत्री पदी 7 वर्षे राहिलेल्या राबडी देवी बिहार विधान परिषदेच्या सदस्य आहेत. महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारियांनी राबडी देवीच्या फोटो सोबत रश्मी ठाकरेंचा फोटो समाज माध्यमावर शेयर करत लिहीले होते 'मराठी राबजी देवी' या प्रकारानंतर हा वाद वाढला. गजारियांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
तीकडे बिहार मधे राष्ट्रीय जनता दलाने या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. राजद प्रवक्ता शक्ती सिंह यादव यांनी म्हणले आहे की, 'कोणालाही माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या विषयी काहीही टिप्पनी करताना एकदा विचार करायला हवा होता त्या बिहारच्या एकमेव महिला मुख्यमंत्री आहेत.भाजप नेत्यांनी कोणत्या मुद्यावर राबडी देवींना ट्रोल केले ते तेच जाणत असतील, पण हे चुकीचे आहे '
हा सगळा प्रकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृती संबधात जुळलेला आहे. ते शस्त्रक्रिये मुळे आजारी आहेत. त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात भाग घेतला नव्हता. यात रश्मी ठाकरे यांना मुख्यंमंत्री बनवण्या च्या विषयावर चर्चा सुरू आहे. भाजप नेत्याने राबडी देवीच्या सोबत रश्मी ठाकरेंचा फोटो लावला. आणि त्यांना मराठी राबडी देवी असा उल्लेख केला. बिहार मधे तेव्हा 1997 मधे लालू यादव यांना जेल मधे जावे लागले. त्यामुळे त्यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री बनवले होते. यावरुन लालू परिवारांवर प्रश्न उपस्थित केले होते.
गजारिया यांनी फक्त एकट ट्विट केले नव्हते तर दुसऱ्यांदा ट्विट करताना मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा फोटो लावताना लिहीले होते की,'जर रश्मी सरकार चालवणार असेल तर मी आणि उपमुख्यमंत्री कशासाठी आहेत' त्यानंतर पोलीसांनी त्यांच्यावर कारवाई केली.
हेही वाचा : Raju Shetty to Central Government : 'केंद्र सरकारने इथून पुढे कर लावण्याचा मूर्खपणा करू नये'