पाटणा - आरजेडीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पिपरा येथील आरजेडीचे माजी आमदार यदुवंश प्रसाद यादव यांनी ब्राह्मणांच्या भारतीयत्वासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. ते भारतातले मूळ निवासी नाहीत असे वादग्रस्त विधान केले होते. हे लोक रशिया आणि इतर देशांतून आले आहेत. महाआघाडीतील घटक पक्ष जेडीयू आणि काँग्रेसने यावर आधीच हल्लाबोल केला होता. आता आरजेडीचे नेतेही याला विरोध करत आहेत. आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, काही लोक अशा गोष्टी बोलतात. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळते. पक्ष कमकुवत होतो. उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही हे स्पष्ट केले आहे, या सर्व विधानांशी पक्षाचा काहीही संबंध नाही.
आरजेडीचे प्रवक्ते म्हणाले- 'यदुवंश प्रसाद यादव हे वक्तव्यवीर आहेत': आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाकडे गरिबांची सत्ता आहे आणि हा ए टू झेड लोकांचा पक्ष आहे. सर्व जाती सर्व धर्मांचा आदर पक्षातील लोक करतात. कोणी काही अपूर्ण ज्ञानाच्या आधारे समाजात फूट पाडत असेल तर ते चुकीचे असून ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. लालू प्रसाद यांचे काम सामाजिक न्याय करणे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचा आदर करणे हे आहे. पक्ष अशी विधाने करत नाही.
राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष आहे कारण या पक्षाने सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत नेण्याचे काम केले आहे. आमचे नेते तेजस्वी यादव यांनीही म्हटले होते की, काही लोक अशी निरुपयोगी विधाने करत राहतात. आम्हाला काही त्यामुळे फरक पडत नाही. हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे. - मृत्युंजय तिवारी, आरजेडी प्रवक्ता
आमच्या पक्षाचे मुख्य उद्दिष्ट सर्व जाती, धर्म आणि विकासात मागे पडलेल्यांना मुख्य प्रवाहात जोडणे आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही पहिली वेळ नाही, की आरजेडी नेत्याने अशी विधाने केली आहेत. याआधीही सरकारचे शिक्षण मंत्री आणि आरजेडी नेते चंद्रशेखर सिंह यांनीही रामचरित मानसवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, आमचे नेते तेजस्वी यादव आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, इतरांनी केलेल्या अशा वादग्रस्त विधानांचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही.