ETV Bharat / bharat

उत्तराखंडमधील 'रिंगाल' आहे तरी काय? जाणून घ्या... - रिंगाल उत्तराखंड बातमी

रिंगाल वनस्पती समुद्रसपाटीपासून एक हजार ते सात हजार फूट उंच भागात आढळते. मात्र, ती बांबूसारखी उंच आणि लांब नसते. याची उंची 10 ते 12 फुटापर्यंत असते. तसेच बांबूच्या तुलनेत ही खूपच पातळ असते. या वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी आणि ओलावा आवश्यक आहे. रिंगालचे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीमुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडत नाही.

ringal in uttarakhand best option for plastic
उत्तराखंडमधील 'रिंगाल' आहे तरी काय?
author img

By

Published : May 17, 2021, 7:33 PM IST

हैदराबाद - आपल्याकडच्या दुर्गम पर्वतांमध्ये अशा अनेक अद्भूत नैसर्गिक देणग्या आहेत, ज्या अजुनपर्यंत जगासमोर आलेल्या नाहीत. संरक्षणाअभावी त्या नष्ट होत आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे रिंगाल ही आहे. रिंगाल ही उत्तराखंडमध्ये आढळणारं विविधपयोगी वनस्पती आहे. ही बांबूच्या कुटुंबातील प्रजाती असल्याचं म्हटले जाते. उत्तराखंडमध्ये याला 'बौना बास' या नावाने ओळखले जाते.

उत्तराखंडमधील 'रिंगाल' बांबू

रिंगाल वनस्पती समुद्रसपाटीपासून एक हजार ते सात हजार फूट उंच भागात आढळते. मात्र, ती बांबूसारखी उंच आणि लांब नसते. याची उंची 10 ते 12 फुटापर्यंत असते. तसेच बांबूच्या तुलनेत ही खूपच पातळ असते. या वनस्पतीच्या वाढीसाठी पाणी आणि ओलावा आवश्यक आहे. रिंगालचे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीमुळे जंगलात आग लागण्याच्या घटना घडत नाही. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासह हे भूस्खलन रोखण्यातही फायदेशीर आहे. या वनस्पतीचा खरा उपयोग पर्यावरणवादी जगतसिंह जंगली करत आहेत.

पर्यावरणवादी जगतसिंह जंगली याबाबत काय म्हणतात?

आमचे कारागीर अनेक पिढ्यांपासून रिंगालवर आधारीत रोजगार मिळवत राहीले आहेत. हे लोक उच्च हिमालय आणि मध्य हिमालयात उंचावर जाऊन रिंगाल आणतात. मी इथं रिंगालचं उत्पादन घेतोय. यापासून कारागीर विविध वस्तू बनवत आहेत. त्यांना रिंगालमुळे रोजगार मिळाला आहे. गेल्या 40 वर्षापासून माझा असा विचार होता, की रिंगालला 6-7 हजार फुट उंचावरून 3-4 हजार फुटांवर आणल्यास, लोकांना याचा फायदा होईल, असे पर्यावरणवादी जगत सिंह जंगली यांनी सांगितले. तसेच आमचे कारागीर रिंगालपासून भांडी बनवायचे. तसेच पूर्वीच्या काळी शेतीशी संबंधित सर्व साधने रिंगालपासूनच बनवली जात. आजही ही परंपरा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

300 पेक्षा जास्त झाडे -

जगत सिंह जंगली रुद्रप्रयागच्या अगस्त्यमुनी ब्लॉकच्या रानीगढ पट्टीच्या कोट मल्ला ग्रामपंचायतीचे रहिवासी आहेत. ते मिश्रित जंगलाला सर्वसामान्य लोकांशी जोडून वन संरक्षणाचे एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवत आहेत. या जंगलात रिंगालची 300 पेक्षा जास्त झाडे आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून नियोजनबद्धरित्या त्यांची कापणी होत आहे. रिंगालपासून कारागीर टोपली, बादली, कुंडी, पेन स्टँड, फुलदाणी, चहाचा ट्रे, कचरापेटी, चटई आणि इतर अनेक वस्तू बनवतात.

जगत सिंह यांनी कठोर परिश्रम घेत एक जंगल तयार केले आहे. त्यांचे हे काम लोकांसाठी प्रेरणादायी आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात येत आहे. बाहेरच्या राज्यात काम करणारे अनेक तरुण काम नसल्याने परत येत आहेत. त्यामुळे रानीगढ भागातील युवकांसाठी मिश्रित वनात जाऊन त्यांनी रोजगाराच्या संधी शोधण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे रिंगाल हे येत्या काळात प्लास्टिकला चांगला पर्याय ठरू शकते. परदेशातून येणारे पर्यटक या जंगलाला भेट देतात. हे जंगल बघितल्यानंतर ते कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.

रिंगालपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन -

रिंगालपासून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. त्यामुळे त्याचं उत्पादन होणं गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. आपण या टोपल्यात फळं आणि भाजीपाला ठेवला की तो खूप दिवसांपर्यंत टिकून राहतो. त्यामुळे लोक या टोपल्यांची खरेदी करत आहे. मी देखील लोकांनी रिंगालपासून बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्या, यासाठी प्रोत्साहित करत आहे, असे त्यांनी सांगतले.

दरम्यान, उत्तराखंडच्या पारंपारिक कलेला वाचवायचे असेल तर रिंगाल हा एक खूप चांगला पर्याय आहे. त्यामुळे सरकारने रिंगालपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर अनेकांच्या हाताला रोजगार मिळेल. तसेच दुर्मिळ होत चालली रिंगाल वनस्पती टिकून राहील.

हेही वाचा - वादळाच्या संकटात 65 वर्षांचे आजोबा बनले कुटुंबाची ढाल, जीव धोक्यात घालून वाचवले नातवाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.