हुबळी-धारवाड (कर्नाटक): निवृत्त प्राध्यापकाशी मैत्री केल्यानंतर एका महिलेने सोशल मीडियावर अश्लील फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत त्याला ब्लॅकमेल करून २१ लाख रुपये nude video caller blackmailed Professor उकळले. हुबळी शहरात ही घटना घडली. पैसे गमावलेल्या धारवाड येथील एका निवृत्त प्राध्यापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. retired professor loses Rs 21 lakh
अंजली शर्मा नावाच्या महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे धारवाडमधील एका प्राध्यापकाची भेट घेतली. पुढे त्यांच्यात मैत्री वाढली. दोघांनी व्हॉट्सअॅपवर त्यांचे खासगी व्हिडिओ आणि फोटोंची देवाणघेवाण केली होती. त्यांनी व्हिडिओ कॉलवरही संवाद साधला.
मात्र काही दिवसांनंतर महिलेने प्रोफेसरच्या व्हिडिओ कॉलचा खासगी व्हिडिओ, फोटो आणि स्क्रीनशॉट दाखवून त्याला ब्लॅकमेल करून 3 लाखांचा गंडा घातला. नंतर, विक्रम नावाचा तिचा साथीदार सायबर पोलीस अधिकारी असल्याचा दावा करत प्राध्यापकाला फोन करतो.
विक्रम प्रोफेसरला म्हणाला, तुला ब्लॅकमेल करणाऱ्या अंजलीला मी ओळखतो. मी तुमचे फोटो आणि व्हिडिओ हटवण्यास मदत करेन. पण त्यासाठी तुम्ही मला ५ लाख द्यावेत. प्रोफेसरने विक्रमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याला त्याच्या बँक खात्याची माहिती दिली.
मात्र प्राध्यापकाच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाला वारंवार धमकावून त्यांच्या खात्यात 21 लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी हुबळी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.