जयपूर (राजस्थान): राज्यातील निवृत्त आयपीएस पंकज सिंह हे राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीमध्ये डेप्युटी एनएसएची भूमिका बजावणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी रात्री उशिरा या संदर्भात आदेश जारी केला. अजित डोवाल यांच्या संघात आयपीएस सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. याआधी पीके सिंह यांनी सीमा सुरक्षा दलात डीजी पदही भूषवले आहे. गेल्या महिन्यातच ते निवृत्त झाले. याआधी त्यांनी राजस्थानमध्ये एसपी ते आयजी आणि एडीजीपर्यंतच्या पदांवर काम केले आहे. राज्यात त्यांची शेवटची नियुक्ती एडीजी पदावर झाली होती.
आयपीएस पंकज सिंह यांनी केले आहे या पदांवर काम: 1988 कॅडरचे आयपीएस अधिकारी पंकज कुमार सिंह यांचा जन्म 1962 मध्ये लखनौ येथे झाला. त्यांच्या सर्व्हिस रेकॉर्डनुसार IPS मध्ये निवड झाल्यानंतर पहिली पोस्टिंग 1990 मध्ये सहाय्यक पोलिस अधीक्षक जोधपूर पूर्व या पदावर झाली. 1992 मध्ये ते जयपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक होते. तर फेब्रुवारी 1992 मध्ये ते ढोलपूरचे पोलिस अधीक्षक झाले. 1993 मध्ये राज्यपालांचे एडीसी, 1993 मध्ये जयपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक, 1994 मध्ये भिलवाडा पोलिस अधीक्षक, 1997 मध्ये पोलिस अधीक्षक सीआयडी दक्षता जयपूर या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती.
सिंग यांनी सीबीआयमध्येही काम केले आहे: पीके सिंग ऑगस्ट 1999 मध्ये सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून दिल्लीला नियुक्तीवर गेले होते. 2002 मध्ये त्यांना दिल्लीतच पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बढती मिळाली. ऑगस्ट 2007 मध्ये बढतीवर, त्यांनी आयजी जयपूर रेंजचा पदभार स्वीकारला. 2009 मध्ये आयजी कार्मिक राजस्थान, 2010 मध्ये आयजी कायदा आणि सुव्यवस्था. 2010 मध्ये, CRPF नवी दिल्ली येथे आयजी पदावर प्रतिनियुक्तीवर गेले. ऑक्टोबर 2014 मध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये येऊन एडीजी क्राईमचा पदभार स्वीकारला.
वडिलांना मिळाला आहे पद्मश्री: त्यांनी 1998 मध्ये जोधपूरचे एसपी आणि 1999 मध्ये अलवरमध्ये एसपी कोटा सिटीचे पद भूषवले आहे. 2018 मध्ये, ADG वाहतूक राजस्थान म्हणून त्यांनी काम पहिले आणि 2020 मध्ये BSF ADG म्हणून नवी दिल्लीला गेले. तेथून ते पदोन्नती घेऊन DG BSF या पदावरून निवृत्त झाले. पीके सिंह यांचे वडील प्रकाश सिंह यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. एक वर्षासाठी बोस्नियाला प्रतिनियुक्तीवर गेले होते.
हेही वाचा: एकही गोळी न चालवता पीएफआयचा खेळ संपला जाणून घ्या कसा बनवला ऑपरेशनचा प्लॅन