ETV Bharat / bharat

मुंबईच्या डॉक्टरची अजमेरमधील रुग्णालयात विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Jun 26, 2021, 7:33 PM IST

अजमेरमधील जवाहरलाल नेहरू रुग्णालयातील ईएनटी विभागात कार्यरत एका निवासी डॉक्टरने संशयास्पदरित्या आत्महत्या केली आहे. हा डॉक्टर मुंबईतील असल्याचे सांगण्यात येत आहे. नातेवाईक अजमेरला पोहोचल्यानंतर शवविच्छेदन केले जातील.

ee
ee

अजमेर - शहरातील एका रुग्णालयात कान-नाक-घसा विभागात कार्यरत एका डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृत डॉक्टरचे नाव अक्षय आहे. अक्षय मुंबईचा रहिवाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अक्षयने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. अक्षय जवाहरलाल नेहरू रुग्णालयात ईएनटी विभागामध्ये रेजिडेंट पदावर डॉक्टर होता.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह शवगृहात ठेवला आहे.पोलिसांनी सांगितले, की गेल्यादोन दिवसांपासून मृत अक्षय कोणाच्याही संपर्कात नव्हता. आत्महत्येच्या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत.

सिव्हिल लाईन ठाणे प्रभारी अरविंद चारण यांनी सांगितले, की अक्षयच्या खोलीतून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळालेली नाही. डॉ. अक्षयच्या खोलीत मोबाईलसह खाद्यपदार्थांची पाकिटे आढळली आहेत. काही ड्रिप व औषधेही मिळाली आहेत. पोलिसांनी मृताचा फोन जप्त केला असून त्याची तपासणी केली जाईल. तसेच संपूर्ण खोलीची व्हिडिओग्राफी करून एफएसएल टीमकडून तपास केला जात आहे.

स्टॉप वॉच होते सुरू -

डॉ. अक्षयचा फोन पोलिसांनी जप्त केला असून त्यामध्ये स्टॉप वॉचचे अ‌ॅप्लिकेशन (stop watch app) चालू होते. घटनास्थळावर घेतलेल्या छायाचित्रांमध्ये स्टॉप वॉचमध्ये सहा तास 41 मिनिटे 39 सेकंद आणि 74 मिली सेकंद टाईम नोट आहे. शक्यता आहे की स्टॉप वॉच डॉ. अक्षय यांनी आत्महत्या करताना सुरू केले असेल.

पोलिसांनी सांगितले, की डॉ. अक्षय दुपारी जेएलएन रुग्णालयात गेले होते. तेथे त्यांनी आपल्या डाव्या हाताला इंजेक्शन व ड्रिप देण्यासाठी वापरण्यात येणारा कॅनुला लावला होता. अक्षयने याच कॅनुलाच्या माध्यमातून इंजेक्शन घेतले असेल ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी होणार होती परीक्षा -

मिळालेल्या माहितीनुसार एएनटी विभागात शनिवारी थर्ड ईयर रेजिडेंट प्रॅक्टिकल परीक्षेचे आयोजन केले होते. त्यामुळे अक्षय मागील काही दिवसांपासून कोणत्याही डॉक्टरशी बोलत नव्हता. पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजून घेऊन तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.