छिंदवाडा - पावसाळा सुरू झाला असून नदी, नाले, धबधबे हे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. धबधबध्यावर आलेल्या अनेक पर्यटकांनी कोरोनाचे नियमांना धाब्यावर बसवल्याचे पहायला मिळाले. नागपूरातील एक कुटुंब वाढदिवस साजरा करण्यासाठी सौसरमधील घोगरा धबधब्यावर गेले होते. नदीच्या मध्यभागी बसून केक कापण्याची त्यांची योजना होती. मात्र, अचानक नदीला पूर आला आणि कुटुंबातील 12 जण पूरात अडकले. पूरातून त्यांची सुटका करण्यात आल्यानंतर लयात केक कापून महिलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
रात्री उशिरापर्यंत चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनंतर कुटुंबातील सर्व 12 जणांना सुखरुप बाहेर काढले गेले. त्यांचे रेस्क्यू ऑपरेशन 10 वाजता सुरू झाले आणि एका तासाच्या आता त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यांची सौसरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रशासनाच्या उपस्थितीत रुग्णालयातच केक कापून महिलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
6 महिला, 4 पुरुष आणि 2 मुले अडकली होती -
दुपारपर्यंत या पाण्याची पातळी कमी पाणी होती. मात्र, दुपारी तीनच्या सुमारास अचानक पाणी वाढले. नागपूरहून सहलीसाठी आलेल्या 12 लोकांमध्ये 6 महिला, 4 पुरुष आणि 2 मुले होती. सर्व लोक धबधबध्यावरील मोठ्या खडकावर होते. तेव्हा अचानक नदीत पाणी वाढले ते तिथेच अडकले.
पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी -
कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मद्यपान करून धबधब्यात अंघोळीला उतरल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक अडकून पडल्याची घटना घडल्या आहेत. तर पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणे यासारख्या प्रकारही घडले आहेत. अशा घटना घडूनही नागरिक खबरदारी बाळगत नसल्याचे दिसते. नागरिकांकडून कोरोना नियमांना हरताळ फासल्याचे पहायला मिळत आहे.