ETV Bharat / bharat

VIDEO : खड्ड्यातून बाहेर काढलेल्या हत्तीचा जेसीबी सोबत पंगा...

खड्ड्यात पडलेल्या हत्तीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मात्र त्या हत्तीने थेट जेसीबी सोबतच दोन हात केले. खेर कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा आवाज करुन आणि जेसीबीच्या पंजाने हत्तीला दूर ढकलण्यात आले आणि हत्ती तिथून निघून गेला.

author img

By

Published : May 20, 2021, 6:44 PM IST

Updated : May 20, 2021, 7:55 PM IST

हत्ती
हत्ती

कोडगू (कर्नाटक) - कॉफी मळ्यातील एका खड्ड्यात पडलेल्या हत्तीला जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. मात्र त्या हत्तीने थेट जेसीबी सोबतच दोन हात केले. ही घटना घडली कर्नाटक राज्यातील वीरजापेट तालुक्यातील अवेरागुंडा जंगलात.

हत्तीचा जेसीबी सोबत पंगा...

अवेरागुंडा जंगल परिसरात कॉफी मळ्याचे शेत आहे. त्याठिकाणी एक हत्ती चरण्याकरिता आला. मात्र तिथे एक खड्डा असल्याने त्यात तो पडला. शेत मालकाने या घटनेची माहिती वन विभागाने दिली. वन कर्मचाऱ्यांनी हत्तीला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले. अखेर जेसीबीने हत्ती बाहेर काढण्याचे कर्मचाऱ्यांनी ठरविले. त्यानुसार घटनास्थळावर जेसीबी मशीन बोलाविण्यात आली आणि हत्तीला बाहेर काढण्यात यश आले. मात्र त्या घाबरलेल्या हत्तीने बाहेर येताच जेसीबीला धक्क्के मारण्यास सुरुवात केली. काहीवेळ हा खेळ सुरू होता. अखेर कर्मचाऱ्यांनी फटाक्यांचा आवाज करुन आणि जेसीबीच्या पंजाने हत्तीला दूर ढकलले आणि हत्ती तिथून निघून गेला.

Last Updated : May 20, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.