ETV Bharat / bharat

जागतिक दर्जाचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे निधन - जागतिक दर्जाचे चित्रकार लक्ष्मण पै

जागतिक दर्जाचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे रविवारी गोवा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. लक्ष्मण पै यांच्या निधनाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला.

लक्ष्मण पै
लक्ष्मण पै
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:48 AM IST

पणजी - प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले जागतिक दर्जाचे चित्रकार लक्ष्मण पै यांचे रविवारी गोवा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. लक्ष्मण पै यांना अनेक पुरस्कारने गौरवण्यात आले. पद्मभूषण, पद्मश्री, नेहरू पुरस्कार आणि ललित कला अकादमी पुरस्कार यांचा समावेश होता. गोवा सरकारतर्फे ‘गोमंत विभूषण’ पुरस्कारही त्यांना देण्यात आला आहे. फ्रान्समध्ये दहा वास्तव करत त्यांनी कलेचा अभ्यास केला.

लक्ष्मण पै यांच्या निधनाबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. तसेच गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही पै यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

भारतासह जगभरात चित्रांची प्रदर्शने भरली -

लक्ष्मण पै यांचे मुळ नाव लक्ष्मण पै फोंडेकर असे आहे. कोंब-मडगाव येथील फोंडेकर यांच्या वडिलोपार्जित घरात त्यांचा जन्म झाला होता. नंतर ते मुंबईत जाऊन चित्रकार म्हणून प्रसिद्ध झाले. 1977 ते 1987 या काळात लक्ष्मण पै यांनी गोवा कॉलेज ऑफ आर्ट्सचे प्राचार्य म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भारतासह जगभरात आयोजित झालेली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन नको असेल तर नियमांचे पालन करा; येदीयुरप्पांचा नागरिकांना इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.