ETV Bharat / bharat

Cyrus Mistry: सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन! नातेवाईकांना वापी येथे हलवले - सायरस मिस्त्री

उद्योगपती सायरस मिस्त्री (Tata Group Cyrus Mistry death) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. टाटा सन्स आणि सायरस मिस्त्री यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

सायरस मिस्त्री
सायरस मिस्त्री
author img

By

Published : Sep 4, 2022, 10:27 PM IST

मुंबई - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला परतत असताना चारोटीजवळील सूर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. यामध्ये दोन जखमींना तातडीने उपचारासाठी वापी येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. संपूर्ण घटनेची माहिती मिळताच उडवाडा अघियारीचे दस्तुरजी यांच्यासह पारशी नेते रुग्णालयात पोहोचले. या घटनेत टाटा समूहाचे सायरस मिस्त्री यांचे निधन झाले. अहमदाबादहून मुंबईला परतत असताना हा अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झाल्याने कारमध्ये बसलेल्या दोघांना तात्काळ उपचारासाठी वापी येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी एक महिला असल्याची माहिती आहे.

व्हिडिओ

सायरस मिस्त्री यांच्यासह दोन लोक दगावल्याची माहिती - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची कार मुंबईच्या Cyrus Mistry death in accident शेजारील महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दुभाजकाला धडकल्याने अपघात झाला आहे. रविवारी झालेल्या अपघातात मिस्त्री ठार झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते, असे त्यांनी सांगितले. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला जात असताना दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सूर्या नदीवरील पुलावर हा अपघात झाला. हा अपघात वाटतो, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सर्व जखमींना गुजरातमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर अपघात झाला. सायरस मिस्त्री यांच्यासह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे उद्योगविश्वात काय राहिले योगदान, वाचा त्यांची आजवरची वाटचाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.