पोको 23 जुलै रोजी भारतात आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन Poco F3 GT लाँच करणार आहे. कंपनी या फोनला रेडमी K40 गेमिंग एडिशनचे रिब्रँडेड व्हर्जन म्हणून लाँच करणार आहे.
भारतीय हवामान विभागाने २३ जुलैला कोल्हापूर जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
23 जुलैला शिल्पा शेट्टीचा 'हंगामा 2' प्रदर्शित होणार आहे. पती 'राज'मुळे करिअरला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
2020 उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा जपानची राजधानी टोकियोमध्ये 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडेल. हे ऑलिंपिक मुळात 2020 मध्ये होणार होते, म्हणून याला 2020 Olympics म्हटले जाते. या स्पर्धा तेव्हा कोव्हिडमुळे पुढे ढकलाव्या लागल्या होत्या.
टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज खेळला जाईल.
आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षेच्या सातव्या टप्प्याचे शेड्युल्ड जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात एनटीपीसी परीक्षा 23,24,26 आणि 31 जुलैला आयोजित केली जाणार आहे. तसेच या टप्प्यात साधारण 22.78 लाख उमेदवार परीक्षा देणार आहेत.
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्राम्हण समाजाला आकृष्ट करण्याचा प्रयत्न हाती घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पक्षातर्फे अयोध्येत 23 जुलै रोजी ब्राम्हण संमेलन आयोजित केले आहे.
हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याची पोर्णिमा २३ जुलै (शनिवारी) सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर पौर्णिमेची समाप्ती ही 24 जुलै रोजी सकाळी आठ वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेची 23 जुलैला अंतिम मुदत आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते.
राज्य सरकारकडून कोव्हिशील्ड नागपूर महानगरपालिकेला लसी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे 18 वर्षांवरील व 45 वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय केंद्रावर शुक्रवारी 23 जुलै रोजी होणार आहे.