1
जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीतील मोठं नाव आहे. त्यांच्या राहणीमान आणि छंदांची लोकांमध्ये चांगलीच चर्चा असते. Jeff Bezos पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जेफ बेजोस यांनी अंतराळात जाण्याची घोषणा केली आहे. जेफ बेजोस 20 जुलै रोजी अंतराळात जाणार आहेत.
2
येत्या 20 जुलैला पांडुरंगाची एकादशी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला वारकरी व भाविकांनी गर्दी करू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून पंढरीत संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 18 जुलै ते 24 जुलै दरम्यान पंढरीत असणार आहे. तर आसपासच्या नऊ गावांमध्ये 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत संचारबंदीचे आदेश आहेत. पंढरपुरातील प्रत्येक भागामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी असणार आहेत. यामध्ये वाखरी तळ, चंद्रभागा नदी पात्र, प्रदक्षिणामार्ग, विठ्ठल मंदिर परिसरावर विशेष लक्ष असणार आहे.
3
आज संपूर्ण कोकण विभागाला आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट दिला आहे. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. आज मुंबईसह, पुणे, पालघर, ठाणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या नऊ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
4
मुंबई - दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अकरावी प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा (CET) २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळात होणार आहे. ही परीक्षा मंडळाशी संलग्न ज्युनिअर कॉलेजांमध्ये होणार असून परीक्षा ऐच्छिक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले. आजपासून परीक्षेकरिता नोंदणी करता येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची सुरुवात २० जुलै २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता सुरू होणार आहे. विद्यार्थी www.cet.mh-ssc.ac.in या वेबसाइटवरून २६ जुलैपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत.
5
शिखर धवन नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंकेत वन डे मालिका जिंकण्याच्या उद्देशाने दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सराव सामन्याला आजपासून सुरुवात करणार आहेत.
6
लोकसभेचे कामकाज आज सकाळी 11 पर्यंत स्थगित करण्यात आलेले आहे. लोकसभेत पेगाससच्या मुद्यावर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले होते. सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले होते.
7
शाओमी भारतातील रेडमी सीरीजमध्ये पहिला ५ जी स्मार्टर्फोन रेडमी नोट १० टी ५ जी नावाने भारतात आज लाँच होणार आहे. हा फोन १४,९९९ मध्ये लाँच होऊ शकतो.
8
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे ययांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीची मुदत संपत आहे. आजवर त्यांची तीनवेळा ईडी कोठडी वाढविण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलैला अटक करण्यात आली.. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक केली होती.
9
तत्व चिंतन फार्मा केमिकलचा आयपीओ 16 जुलै रोजी खुला झाला आहे. गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ 20 जुलैपर्यंत खुला असणार आहे. तत्व चिंतन फार्माने आयपीओसाठी प्राइस बँड तयार केला आहे. तत्व चिंतन फार्मा केम कंपनीने आयपीओची प्राइस बँड 1073 ते 1083 रुपये निश्चित केली आहे.
10
तमिल ब्लॉकबस्टर असुरनचा तेलगु रिमेक अॅमेझॉनवर प्रदर्शित होत आहे. यामध्ये विजय वेंकटेशने मुख्य भूमिका साकारली आहे. नराप्पा असे या सिनेमाचे नाव आहे.