महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अखंड सौभाग्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका व्रत ( Hartalika 2022 ) तसेच वटसावित्रीची ( Vatsavitri ) पूजा केली जाते. तशीच करवा चौथ ही प्रथा उत्तर भारतात फार महत्वाची मानली जाते. करवा चौथ दरवर्षी साजरा ( Karwa Chauth 2022 ) केला जातो. हिंदू धर्मात हे व्रत फार महत्वाचे मानले जाते. अनेक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी निर्जला व्रत पाळतात. सावित्रीने आपल्या पतीला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढले होते आणि तेव्हापासून या दिवसाचा उत्सव सुरू झाला, असे मानले जाते. या वर्षी करवा चौथ 13 ऑक्टोबरला येत आहे. तसेच या दिवशी विशेष योगायोग असल्याचे मानले जाते.
करवाचौथ शुभ मुहूर्त : 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.54 ते सायंकाळी 7.09 ही वेळ करवाचौथ पूजेसाठी शुभ मानली जाते. यानंतर चंद्रोदयाच्या दिवशी महिला आपल्या पतीसोबत पूजा करून उपवास सोडू शकतील.
करवा चौथला विशेष योगायोग होत आहे - 13 ऑक्टोबरला संध्याकाळी 6.41 पर्यंत कृतिका नक्षत्र असल्याचे मानले जाते, त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल. यासोबतच ज्योतिषशास्त्रानुसार करवा चौथच्या दिवशी चंद्र देवता वृषभ राशीत संचार करेल. करवाचौथच्या दिवशी हे संक्रमण आणि रोहिणी नक्षत्र यांचा संयोग अतिशय शुभ मानला जातो, जो व्रत ठेवणाऱ्या विवाहित जोडप्यांसाठी चांगला सिद्ध होईल.
करवा चौथ पूजेची पद्धत - सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्नान केल्यानंतर, मंदिर स्वच्छ करुन दिवा लावावा. देवतांची पूजा करावी. निर्जल व्रत संकल्प घ्यावा. या पवित्र दिवशी शिव कुटुंबाची पूजा केली जाते.सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते.माता पार्वती, भगवान शिव आणि कार्तिकेय यांची पूजा करावी. यानंतर स्त्रिया जमतात आणि करवा चौथ व्रताची कथा ऐकतात. करवा चौथच्या व्रतामध्ये चंद्राची पूजा केली जाते. चंद्र पाहिल्यानंतर, चाळणीतून पतीकडे पहावे. यानंतर पतीने पत्नीला पाणी देऊन उपवास मोडावा.