मुंबई : क्रिप्टोकरन्सी ही प्रकारची डिजिटल मालमत्ता समजली. ज्याप्रकारे आपण नोटा आणि नाण्याद्वारे व्यवहार केला जातो, त्याचप्रकारे वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सी वापरली जाते. ही एक इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे, ज्याद्वारे आपण इंटरनेटवरून नियमित चलनांऐवजी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरू शकतो. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) आहे.
क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,92,313 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,03,649 रूपये आहे. बायनान्सची किंमत 21,258 रूपये आहे.
काय आहे क्रिप्टो चलन : क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन ( what is Cryptocurrency) मानले जाते. हे चलन अस्थिर असल्यामुळे त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घ काळापर्यंत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम समजली जाते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम म्हणून पाहिले जाते. इनक्रिप्ट तंत्रज्ञानाच्या डिजीटल एककामधून क्रिप्टोचलनाचा व्यापार केला जातो. हे चलन स्वतंत्रपणे मध्यवर्ती बँकेकडून चालविण्यात ( Cryptocurrency Prices 6 January 2023 ) येत आहे.
1. बीटकॉईन : बिटकॉईन हा क्रिप्टोचलनाचा एक प्रकार आहे. विकेंद्रित डिजिटल चलन म्हणून बिटकॉईनकडे पाहिले जाते. बिटकॉईन हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित केले जात नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today in India) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते.
2. लिटकॉइन (Litecoin) : क्रिप्टोरन्सीचा आणखी एक प्रकार म्हणजे लिटकॉईन आहे. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉइन लॉन्च करण्यात आले. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉईन २०११ मध्ये लाँच केले गेले होते. लिटकॉइन हे एक ओपेन स्त्रोत समजले जाते, ग्लोबल पेमेंट नेटवर्क आहे. जे पूर्णपणे विकेंद्रित आहे. त्यावर सरकारचे कोणतेही केंद्रीय अधिकारी नाहीत. लिटकॉइन एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आणि मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. चार्ली ली ह्याने लिटकॉइनची निर्मिती केली आहे. चार्ली ली हा गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारा एक कर्मचारी आहे.
3. एथेरियम (Ethereum) : एथेरियम हा क्रिप्टोकरन्सीचा आणखी एक प्रकार आहे. २०१५ मध्ये एथेरियम तयार करण्यात आले होते. जो ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित मुक्त स्रोत मंच आहे. इतर ब्लॉकचेन्स प्रमाणेच, एथेरियमचे एथेर नावाचे मूळ क्रिप्टोकरन्सी आहे. हे पूर्णपणे डिजिटल आहे आणि जगात कोणासही त्वरित पाठवले जाऊ शकते. एथेरियम पुरवठा कोणत्याही सरकार किंवा कंपनीद्वारे नियंत्रित केला जातो. जगभरातील लोक एथेरियमचा उपयोग पेमेंट करण्यासाठी (Cryptocurrency Prices Today In India ) करतात.