मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा चलनातून काढून घेण्याचा आदेश जारी केला आहे. परंतु सध्याच्या नोटा अवैध होणार नाहीत. सर्वसामान्य नागरिक 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बॅंकेत बदलू शकतात. एका वेळी वीस हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलल्या जातील. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, इतर मूल्यांचे चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर 2000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आरबीआयने 2018-19 मध्ये 2000 रुपयांच्या नोटांची छपाई आधीच बंद केली होती.
-
Reserve Bank of India has advised banks to stop issuing Rs 2000 denomination banknotes with immediate effect though banknotes in Rs 2000 denomination will continue to be legal tender. https://t.co/yLWWpyuahL pic.twitter.com/kPTMqlm1XD
— ANI (@ANI) May 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Reserve Bank of India has advised banks to stop issuing Rs 2000 denomination banknotes with immediate effect though banknotes in Rs 2000 denomination will continue to be legal tender. https://t.co/yLWWpyuahL pic.twitter.com/kPTMqlm1XD
— ANI (@ANI) May 19, 2023Reserve Bank of India has advised banks to stop issuing Rs 2000 denomination banknotes with immediate effect though banknotes in Rs 2000 denomination will continue to be legal tender. https://t.co/yLWWpyuahL pic.twitter.com/kPTMqlm1XD
— ANI (@ANI) May 19, 2023
30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येतील : शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात, रिझर्व बँकेने म्हटले की, 'भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 'स्वच्छ नोट धोरणा'च्या अनुषंगाने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र 2000 च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. ही प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला पुरेसा वेळ देण्यासाठी सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 च्या नोटा बदलण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी'. नोव्हेंबर 2016 मध्ये 2 हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्या होत्या. त्याच्या जागी नवीन पॅटर्नमध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या.
म्हणून घेतला निर्णय : या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना आरबीआयने म्हटले की, 2000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के मूल्याच्या नोटा मार्च 2017 पूर्वी जारी केल्या गेल्या होत्या. सध्या चलनात असलेल्या या नोटांचे एकूण मूल्य 31 मार्च 2018 रोजी 6.73 लाख कोटी रुपयांवरून 31 मार्च 2018 रोजी 3.62 लाख कोटीवर घसरले आहे. बॅंकेने हे देखील निदर्शनास आणले आहे की, 2000 रुपयांची नोट सामान्यत: व्यवहारासाठी वापरली जात नाही. तसेच इतर मूल्यांच्या नोटांचा साठा लोकांच्या चलनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा आहे.
हेही वाचा :