ETV Bharat / bharat

RBI Big Announcement :पीएनबी, इंडियन आणि युनियन बँकेतील खातेधारकांसाठी आरबीआयची मोठी घोषणा, वाचा सविस्तर - ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल

जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियन बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरू शकते. या बँकांच्या खातेधारक आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी रिझर्व बँकेकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. आरबीयचे (RBI)गव्हर्नर शक्तिकांत दास ( RBI Governor big announcement ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

RBI Big Announcement
आरबीयची मोठी घोषणा
author img

By

Published : Oct 6, 2022, 1:31 PM IST

Updated : Oct 6, 2022, 2:44 PM IST

नवी दिल्ली : जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया किंवा इंडियन बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरू शकते. या बँकांच्या खातेधारक आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी रिझर्व बँकेकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. आरबीयचे (RBI)गव्हर्नर शक्तिकांत दास ( RBI Governor big announcement ) यांनी याबाबत माहिती दिली आहे. अलीकडेच, ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये,( Global fintake festival ) गव्हर्नर दास यांनी UPI नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्ड (Rupee Credit Card) लॉन्च केले आहे. यामुळे क्रेडिट कार्डधारक खूश होतील.

रुपे ( UPI ) क्रेडिट कार्डशी लिंक करण्याची सुविधा : सर्व सरकारी बँकांचे सर्व डेबिट कार्डधारकांना त्यांच्या खात्यांसोबत UPI लिंक करण्याची सुविधा देत आहेत. पंजाब नॅशनल बँक (PNB), युनियन बँक ऑफ इंडिया(Union Bank of India) आणि इंडियन बँक(Indian Bank) यांना आरबीआयने ही सर्वात आधी देण्याची घोषणा केली आहे. यांनतर खासगी बँकांनाही ही सुविधा दिली जाणार आहे.

क्रेडिट इकोसिस्टमची व्याप्ती वाढणार : UPI विकसित करणाऱ्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सांगितले आहे की, ह्या अॅपचा वापर केल्यास आता ग्राहक आणि व्यापारी दोघांनाही फायदा होईल. तुम्हाला किराणा दुकानातून कोणतीही वस्तू घ्यायची असल्यास, UPI QR कोड स्कॅन करून, तुम्ही क्रेडिट कार्डनेही पेमेंट करू शकाल. आतापर्यंत बँक खाते UPI अॅपशी लिंक करून पेमेंट करण्याची सुविधा होती. परंतु आता रुपे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. .यामुळे क्रेडिट इकोसिस्टमची व्याप्ती वाढेल. RuPay क्रेडिट कार्ड व्हर्च्युअल पेमेंट पत्त्याशी लिंक केल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित असेल.

सीमापार व्यवहाराची सुविधा : रुपे क्रेडिट कार्डच्या व्यतिरिक्त यूपीआई लाइट (UPI Lite) लॉन्च करण्यात आले आहे. तुम्हाला कमी खर्चात करू इच्छित असलेल्या सर्व व्यवहारांसाठी हे ऑन-डिव्हाइस वॉलेट खूप उपयुक्त ठरेल. बिल पेमेंट सिस्टम (BBPS) अंतर्गत क्रॉस बॉर्डर व्यवहारांची सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे. यूपीआई लाइट (UPI Lite) द्वारे, तुम्ही इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकाल. याचा उपयोग मात्र तुम्ही 200 रूपयाची बिले भरण्यासाठी करू शकता. विदेशातूनही तुम्ही क्रॉस बॉर्डर बिल पेमेंट सिस्टमने भारतातील बिले भरू शकतात.

Last Updated : Oct 6, 2022, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.