आगरतळा : त्रिपुरामधील उनाकोटी येथील कुमारघाट येथे बुधवारी रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना घडली. उनाकोटी येथील चौमुहनी परिसरातून जाणऱ्या रथ यात्रेचा उच्च दाब असलेल्या विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने शॉक लागून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
इतक्या लोकांचा मृत्यू : या रथ यात्रेसाठी शेकडो भाविक उपस्थित होते. रथ यात्रेच्या मिरणवणुकीदरम्यान ही दुर्घटना झाल्याने भाविकांमध्ये गोंधळ उडला. मिळालेल्या माहितीनुसार, उनाकोटी येथील चौमुहनीमध्ये रथयात्रा काढण्यात आली होती. या रथामध्ये साधरण 20 लोक बसले होते. रथ चालू असताना या रथावर एक उच्च दाब असलेली विद्युत वाहक तार पडली. यामुळे विजेचा धक्का लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु त्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात येत आहे. पण याची अधिकृत माहिती कोणी दिलेली नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 22 वर पोहोचली असल्याची चर्चा परिसरात आहे.
काय म्हणाले पोलीस : दरम्यान पोलिसांकडून या बाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. एसडीपीओ कुमारघाट कमल देबबर्मा यांनी ईटीव्ही भारत या प्रकरणाची माहिती दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही.
"सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता आणि लोक अल्टो रथ यात्रेसाठी जमत होते. ही घटना घडल्यानंतर लगेचच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले,” दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. - एसडीपीओ कुमारघाट कमल देबबर्मा
मृतांचा आकाडा वाढू शकतो : घटनास्थळावरील सूत्रांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात नेण्यात येत असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. या घटनेनंतर रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. “आम्ही मिरवणुकीत जात होतो, तेव्हा रथाचा स्पर्श हाय व्होल्टेज असलेल्या ताराशी झाला. परंतु यामुळे विजेचा धक्का लागल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना आम्ही त्यांना तत्काळ कुमारघाट रुग्णालयात दाखल केले. तर काहींना कैलाशहर रुग्णालयात उपचारासाठी नेले. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. - प्रत्यक्षदर्शी
हेही वाचा -