ETV Bharat / bharat

Lalu Released On Bail Today : लालू प्रसाद यादव यांची आज जामिनावर सुटका - लालू प्रसाद यादव यांती तब्येत

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची आज तुरुंगातून जामिनावर सुटका होणार आहे. (Lalu Prasad Yadav Released On Bail) या पार्श्वभूमीवर तुरंगाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लालू प्रसाद यादव
लालू प्रसाद यादव
author img

By

Published : Apr 28, 2022, 12:25 PM IST

रांची - चारा घोटाळ्याशी संबंधित डोरंडा कोषागारातून पैसे काढल्याप्रकरणी दोषी ठरलेले लालू प्रसाद यादव यांची आज गुरुवार(दि. 28 एप्रिल)रोजी जामिनावर तुरुंगातून सुटका होणार आहे. (Lalu Released on Bail Today) बुधवारी उच्च न्यायालयाकडून जामीनाचा आदेश दिवाणी न्यायालयात पाठवण्यात आला. लालू प्रसाद यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी आज जामीनपत्र भरले असून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची दुपारपर्यंत तुरुंगातून जामिनावर सुटका होणार आहे.

व्हिडिओ

लालू प्रसाद यांना डोरंडा प्रकरणात दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना 5 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावला होता. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना १० लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. (Doranda case to Lalu Prasad) जे जामीन बाँड प्रक्रियेदरम्यान जमा करण्यात आला आहे. अंजल किशोर सिंग हा या खटल्यात जामीनदार आहे. रिलीझ ऑर्डर जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आता येथून बिरसा मुंडा कारागृहात सुटकेचा आदेश पाठवण्यात आला आहे.

अधिवक्ता प्रभात कुमार यांनी सांगितले की, लालू प्रसाद यादव यांना 42 महिन्यांची शिक्षा झाली असून सध्या त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत, तर लालूप्रसाद यादव यांना एम्समधून डिस्चार्ज मिळणार की नाही, हे पूर्णपणे एम्सच्या डॉक्टरांवर अवलंबून आहे. लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात (1996 ते 2022)पर्यंत एकूण 42 महिने तुरुंगवास भोगला आहे.

पशुसंवर्धन घोटाळ्याच्या RC 64 A/96 मध्ये त्यांना 7 वर्षे, RC 47A/96 मध्ये 5 वर्षे, RC 68A/96 मध्ये 3 आणि RC 38A/96 मध्ये साडेतीन वर्षांची शिक्षा झाली आहे. अधिवक्ता प्रभात कुमार यांनी सांगितले की, पाच प्रकरणांमध्ये कमाल 5 वर्षांची शिक्षा पूर्ण झाली आहे. जेल मॅन्युअलनुसार, सश्रम कारावासाची शिक्षा झालेल्यांना 9 महिन्यांची शिक्षा ही एक वर्षाची शिक्षा मानली गेली. दरम्यान, सीबीआय कोर्टातून सुटकेचा आदेश जारी झाल्यानंतर आरजेडी नेत्यांमध्ये आनंदाची लाट आहे.

या सर्व प्रकरणाची माहिती देताना आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष रंजन यादव म्हणाले की, आजचा दिवस अतिशय शुभ असून तो उत्सव म्हणून साजरा केला जात आहे. यासंदर्भात राजद कार्यालयात इफ्तार पार्टीचे आयोजनही करण्यात आले आहे. येथे आरजेडी नेते इरफान अन्सारी म्हणाले की, रमजानचा महिना सुरू आहे आणि अल्लाह तालाने रमजानचा आशीर्वाद देताना लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आणि आज ते जामिनावर बाहेर आले आहेत, ही सर्वात मोठी ईदी आहे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Climate of India : उष्णतेची लाट! अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.