ETV Bharat / bharat

Karnataka CM decision : कोण होणार कर्नाटकाचा मुख्यमंत्री उत्तरासाठी पाहावी लागेल 72 तास वाट; रणदीप सुरजेवालांनी दिली नवी अपडेट - मल्लिकार्जुन खर्गे

कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्ष कोणाला मुख्यमंत्री बनवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्यासाठी दोन मोठे दावेदार आहेत. या निर्णयाविषयी माहिती देताना काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी नवी अपडेट दिली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 17, 2023, 5:22 PM IST

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्ष कोणाला मुख्यमंत्री बनवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्नाटक राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला तब्बल 72 तास वाट पाहावी लागणार आहे. या निर्णयाविषयी माहिती देताना काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी नवी अपडेट दिली आहे. त्यांची अपडेट ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काय आहे नवी अपडेट : कारण कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्यासाठी दोन मोठे दावेदार आहेत. काहीजण म्हणतात की, सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्री होतील. तर काहीजण म्हणतात की, डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसतील. परंतु अद्याप काँग्रेस नेते यावर कोणताच निर्णय घेऊ शकलेले नाहीत. यामुळे कोणत्याच अफवांना बळी पडून नका असे आवाहनही नवी अपडेट देताना सुरजेवाला यांनी केले आहे.

  • #WATCH | Delibrations are currently underway by party president Mallikarjun Kharge. Whenever Congress makes a decision we will inform you. In the next 48-72 hours, we will have a new cabinet in Karnataka: Randeep Surjewala, Karnataka in-charge, Congress pic.twitter.com/fas1Bpu3J3

    — ANI (@ANI) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, पुढच्या 48 ते 72 तासात यावर निर्णय होईल. मुख्यमंत्री कोणाला करायचे यावर आमची अजून चर्चा सुरू आहे.- काँग्रेस प्रभारी रणदीप सुरेजवाला

सुरजेवाला अजून काय म्हणाले : कर्नाटकच्या सत्ता स्थापनेविषयी लवकरच निर्णय होणार आहे. त्यानंतर एकदा सरकार स्थापन झाले की, पुढच्या 48 ते 72 तासात मंत्रिमंडळाची बैठक होईल, असे सुरजेवाला म्हणालेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोलताना त्यांनी भाजपावर टीका देखील केली आहे. भाजपाचा मोठा पराभव झाल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून भाजपा खोट्या बातम्या पसरवत आहे.

शपथविधीची तयारी सुरू : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सत्ता हिसकावून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. पण चार दिवस उलटले तरी अद्याप राज्याला मुख्यमंत्री कोण होणार हे समजू शकलेले नाही. परंतु सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असे त्यांच्या समर्थकांना वाटत असून त्यांनी सिद्धरामय्या यांच्या समर्थनात फटाके फोडले तर काहींना त्यांच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केला आहे. तर पोलीस अधिकारी बेंगळुरूमधील श्री कांतीरवा आउटडोअर स्टेडियमची पाहणी करत आहेत. या ठिकाणी नवीन कर्नाटक सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले दोन्ही नेते राहुल गांधींना भेटले आहेत. दोन्ही नेत्यांनी राहुल गांधींसोबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सिद्धरामय्या यांनी राहुल गांधींसोबत तब्बल अर्धा तास चर्चा केली होती.

हेही वाचा -

  1. Nagpur Crime News: शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देण्याचे आमिष दाखवून भाजप आमदारांना गंडा, आरोपीला गुजरातमधून बेड्या
  2. MEA Slams US Report : धार्मिक हिंसाचारावरुन अमेरिकेच्या अहवालात भारतावर टीका, भारताने फेटाळला पक्षपाती अहवाल
  3. JP Nadda Maharashtra Visit : जे.पी. नड्डा मुंबईत पोहोचले, कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.