ETV Bharat / bharat

Amisha Patel Warrant: पुन्हा एकदा अटक वॉरंट जारी! अभिनेत्री अमिषा पटेलला अटक होणार? - अभिनेत्री अमिषा पटेलला रांची कोर्टाचे अटक वॉरंट

अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात रांची सिव्हिल कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. चेक बाऊन्स झाल्यानंतर चित्रपट निर्माते अजय कुमार सिंग यांनी अमिषा पटेल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Amisha Patel Warrant
अभिनेत्री अमिषा पटेल
author img

By

Published : Apr 6, 2023, 10:43 PM IST

रांची (झारखंड) : 'कहो ना प्यार है' या प्रसिद्ध चित्रपटाची अभिनेत्री अमिषा पटेलविरोधात रांची सिव्हिल कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. झारखंडचे चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांनी अमिषा पटेल विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ही घटना 2017 सालची आहे. आरोपानुसार, चित्रपट बनवण्याच्या नावाखाली अजयने अमीषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर होऊनही अमिषाने चित्रपट बनवला नाही. पैसे मागितल्यावर त्याला अभिनेत्रीने चेक दिला. जो चेक पुढे बाउन्स झाला. त्यानंतर त्यांनी वरील तक्रार केली होती.

दोघांची ओळख : अजय कुमार सिंग हरमू हाउसिंग कॉलनीतील एका कार्यक्रमादरम्यान अमिषा पटेलला भेटले आणि त्यांना चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याची ऑफर मिळाली. देसी मॅजिक हा चित्रपट बनवण्याच्या नावाखाली त्यांनी अमीषा पटेलच्या खात्यात अडीच कोटी रुपये ट्रान्सफर केले. अजय कुमार सिंग हे लव्हली वर्ल्ड एंटरटेनमेंटचे मालक आहेत. चित्रपट न बनवल्यानंतर आणि पैसे परत न केल्याने अजय कुमार सिंह यांनी कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. अमिषा पटेलने त्यांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे. चित्रपट बनला नसताना त्याचे पैसे परत मिळाले नाहीत.

पोलीस करणार अमिषाला अटक? : गेल्या 6 वर्षांपासून रांचीमध्ये अभिनेत्री अमिषा पटेलचा खटला सुरू आहे. हे प्रकरण अमिषा पटेलशी संबंधित असल्याने देशभरातील लोकांचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. आता पुन्हा एकदा दिवाणी न्यायालयाकडून वॉरंट जारी झाल्यानंतर अमिषा पटेलला जामीन घ्यावा लागेल तरच तिला दिलासा मिळणार आहे. तर आता रांची पोलीस काय करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. न्यायालयाकडून वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांना अटक करण्याचे अधिकार प्राप्त होतात. त्याचवेळी, अमिषा पटेलवर वॉरंट जारी झाल्यानंतर ती रांचीला येते की तिच्या वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज करते हे पाहावे लागेल.

3 वर्षांपूर्वी जारी केले होते वॉरंट : अजय कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी यापूर्वी ग्राहक न्यायालयातही केस दाखल केली होती. ज्याची न्यायालयाने दखल घेतली. 2020 मध्ये अमिषा पटेल आणि तिच्या कर्मचाऱ्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये अमिषा पटेलच्या वकिलानेही जामीन घेतला होता.

हेही वाचा : Akanksha Dubey suicide case: समर सिंह परदेशात जाऊ शकणार नाही, लुकआउट नोटीस जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.