मुंबई Ramdas Athawale on Nitish Kumar : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संततिनियमनाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा मागणी केली. महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्या वक्तव्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी महिलांबाबत केलेलं आक्षेपार्ह विधान योग्य नाही. महिलांचा आदर करणं ही आपली जबाबदारी आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे, पण तसं होत नाही. त्यांच्यावर काही कारवाई झालीच पाहिजे, असंही आठवले म्हणाले.
सर्व स्तरातून टिकास्त्र : मुख्यमंत्री हा एक जबाबदार व्यक्ती असायला हवा. त्यांनी माफी मागितली आहे, पण तुम्हाला जे हवं ते बोलणं, त्यानंतर माफी मागणं याला काही किंमत नाही. भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी बुधवारी म्हटलं की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद, निंदनीय आणि वेदनादायक आहे. नितीश कुमार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं विधान लज्जास्पद, निषेधार्ह आणि वेदनादायक आहे. यावरून इंडिया आघाडीतील नेत्यांची महिलांसाठी असलेली मानसिकता दिसून येते, असं भाजपा नेते म्हणाले. बुधवारी सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बिहार विधानसभेत गोंधळ झाला. जन्म नियंत्रणावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधात विरोधी सदस्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.
नितीश कुमारांचा माफीनामा : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल त्वरीत माफी मागितली. ते म्हणाले, मी माफी मागतो. माझे शब्द मागे घेतो, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. भाजपाच्या आमदारांनी त्यांना विधानसभेत जाऊ दिलं नाही. मंगळवारी विधानसभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री म्हणाले की, महिलांना शिक्षित केलं पाहिजे, कारण यामुळं त्यांना गर्भधारणा होणारे लैंगिक संबंध टाळता येतील. मंगळवारी जातीच्या जनगणनेवरील चर्चेदरम्यान विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला संबोधित करताना, राज्यातील लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी मुलींच्या शिक्षणाची गरज अधोरेखित करताना मुख्यमंत्र्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली. नितीश कुमार यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात दावा केलाय की, राज्याचा प्रजनन दर, जो पूर्वी 4.3 टक्के होता, तो आता 2.9 टक्क्यांवर घसरलाय. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळं भाजपा तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) अध्यक्षांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी बिनशर्त माफी मागावी अशी महिला आयोगानं मागणी केली.
हेही वाचा :
- Nitish Kumar : नितीश कुमारांच्या अडचणी वाढल्या, महिलांबद्दलच्या असभ्य टिप्पणी प्रकरणी तक्रार दाखल; 'या' दिवशी सुनावणी
- Narendra Modi : 'नितीश कुमारांना काही लाज वाटत नाही', लोकसंख्या नियंत्रणाबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावरून मोदींचा हल्लाबोल
- CM Nitish Kumar Apologized : मुख्यमंत्री नितिश कुमारांचा 'त्या' वक्तव्यावरुन माफीनामा, पहा काय म्हणाले?