लखनऊ - रिपब्लिकन पार्टी ( Ramdas Athawale on shivsena says ) ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी योजना भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील ( Ramdas Athawale on sanjay raut ) घडामोडींवर उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात शिवसैनिक जे काही करत आहेत ते अजिबात योग्य नाही.
हेही वाचा - जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोर ठार, वर्षभरात 100 दहशतवाद्यांचा खात्मा
संजय राऊत यांच्या सांगण्यावरून गुंडगिरी केली जात असल्याचे आठवले म्हणाले. या गुंडगिरीला उत्तर द्यावे लागेल. शिवसैनिक रस्त्यावर आले तर भीमसैनिकही रस्त्यावर उतरतील. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करावे.
उद्धव ठाकरे अडीच वर्षे सरकार चालवत होते. मात्र, आजपर्यंत त्यांना विधानसभेतील अध्यक्ष पद भरता आले नाही. विधानसभा अध्यक्षाशिवाय सुरू होती. आता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे पुरेसे आमदार आहेत आणि खर्या अर्थाने आता शिवसेना पूर्णपणे एकनाथ शिंदे यांची आहे. उद्धव ठाकरेंवर त्यांचेच आमदार नाराज आहेत, असे आठवले म्हणाले.
उद्धव ठाकरे भेटत नसायचे असे ते नेहमी म्हणायचे. या नाराजीमुळे उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. जर बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना असेल आणि त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे असेल. तर एकनाथ शिंदे हेही सातत्याने शिवसेनेत आहेत, त्यामुळे तेही शिवसेनेचेच प्रोडक्ट आहेत. आता त्यांचाकडे पाठिंबा आहे तर ही शिवसेना त्यांचीच आहे. महाविकास आघाडी ही विकासाऐवजी विनाशाची आघाडी आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही बोललो आहे. लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाली पाहिजे. आरपीआयलाही एक मंत्रिपद मिळाले पाहिजे. भाजपने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास केला आहे, असे आठवले म्हणाले.
हेही वाचा - तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्या T-Hub च्या नवीन सुविधेचे करणार उद्घाटन