नवी दिल्ली- केंद्रीय नेते रामदास आठवले यांनी शिवसेनेतील बंडखोरीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ( Ramdas Athawale blames Sanjay Raut ) टीका केली आहे. शिवसेना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार नव्हे तर संजय राऊत यांच्या फुटल्याचा ( split in Shiv Sena ) त्यांनी आरोप केला आहे. नुकतेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी शरद पवार यांच्यामुळे शिवसेना फुटल्याचा आरोप केला होता.
रिपाई गटाचा मंत्री मंडळात सहभाग असणार - राज्यात काही दिवसांपूर्वीच शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अता काहीं दिवसातच राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून या मंत्री मंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले गट) देखील १ मंत्री पद मिळेल शिवाय इतरही शासकीय महामंडळात वाटा मिळणार आहे. असेही केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांगण्यात यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
शिवसेनेत फुट पडल्याचा दावा - आठवले यांनी माध्यमांशी बोलत असताना शरद पवार नव्हे, तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामुळे शिवसेनेत फुट पडल्याचा दावा केला आहे. राऊतांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास तयार झाल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. राऊतांमुळेच शिवसेना फुटली, असंही आठवलेंनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात रोज नव्याने आरोप केले जात आहेत. संजय राऊत (Sanjay Raut)यांना राष्ट्रवादीसोबत जायचं असल्याने त्यांनी भाजप शिवसेनेची युती तोडली असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी गडबड केली नसती तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात स्थापण झालं नसतं. तसेच भाजप शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रात आलं असतं.
काय आहे प्रकरण - एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना ( Eknath Shinde Vs Shivsena ) वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेनेचे 20-21 आमदार सोबत घेत 20 जूनला रात्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये जात सूरत गाठली. सेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आला. शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना माघारी फिरण्याचे आवाहन करूनही आमदार माघारी फिरले नाहीत. उलटपक्षी दिवसागणिक आणखी एक एक आमदार शिंदे गटाला जाऊन मिळू लागला. बंडखोरी वाढतच जात असल्याचे पाहून शिवसेनेने पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप आमदारांना जारी केला. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे बंडखोर गटातील 16 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती.