भारताचे महान संत आणि विचारवंत रामकृष्ण परमहंस यांचा जन्म फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला झाला. यावर्षी ही तारीख 21 फेब्रुवारी रोजी येत आहे. म्हणजे यंदा 21 फेब्रुवारी मंगळवार रोजी रामकृष्ण परमहंस यांची 187 वी जयंती आहे. रामकृष्ण परमहंस यांचे बालपणीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय होते. तारखेनुसार, त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी बंगाल प्रांतातील कमरपुकुर गावात एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. पंचांगानुसार तो दिवस फाल्गुन शुक्ल द्वितीया होता. त्यांच्या वडिलांचे नाव खुदीराम आणि आईचे नाव चंद्रमणी देवी.
सर्व धर्म समभाव मानणारे : रामकृष्ण परमहंस लहानपणापासूनच त्यांचा देवावर प्रचंड विश्वास होता, म्हणून त्यांनी कठोर तप आणि भक्ती केली आणि ईश्वर प्राप्तीसाठी साधे जीवन जगले. त्यांनी आयुष्यात कधीही शाळेला भेट दिली नव्हती. त्यांना ना इंग्रजी येत होते, ना संस्कृतचे ज्ञान होते. ते फक्त महाकालीचे भक्त होते. ते मानवतेचे पुजारी होते. हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मांवर त्यांची सारखीच श्रद्धा होती, याचे कारण त्यांनी त्या सर्वांचे आचरण करून त्यातील अंतिम सत्याचे दर्शन घेतले होते.
व्यक्तीगत माहिती : रामकृष्ण परमहंस यांच्या वडीलांचे नाव खुदीराम आणि आईचे नाव चंद्रा देवी होते. परमहंसजींचे बालपणीचे नाव गदाधर होते. त्यांच्या पत्नीचे नाव शारदामणी देवी होते. रामकृष्णांच्या गुरूचे नाव तोतापुरी होते. रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. स्वामी विवेकानंद हे त्यापैकी एक होते. महाकाली यांच्या भक्ती आणि कर्तृत्वामुळे रामकृष्ण परमहंसजींची कीर्ती दूरवर पसरली होती. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी इतर धर्मांबद्दलही ज्ञान मिळवले होते. सर्व धर्मांच्या एकतेवर त्यांनी भर दिला. रामकृष्ण परमहंस यांचे वयाच्या 50 व्या वर्षी 16 ऑगस्ट 1886 रोजी कोलकाता येथे निधन झाले.
'रामकृष्ण मिशन'ची स्थापना : स्वामी विवेकानंद यांचा देखील ईश्वरावर प्रचंड विश्वास होता आणि त्यांना सुध्दा ईश्वाराचे दर्शन प्रत्यक्षात घ्यायचे होते, अर्थात हेच त्यांच्या जीवनाचे उद्दीष्ट होते. आणि विवेकानंदांच्या याच जिज्ञासेने त्यांची भेट स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. या गुरु शिष्यांचे नाते प्रचंड पवित्र आणि अलौकिक असे होते, त्यामुळेच आजही जग दोघांचे नाव एकत्र घेतात आणि गुरु शिष्याचे हे नाते जगासाठी प्रेरणा देणारे आहे. रामकृष्ण परमहंसांच्या सर्वात प्रसिद्ध शिष्यांपैकी एक असलेल्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरूंच्या शिकवणीचा प्रचार करण्यासाठी 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. त्याचे मुख्यालय बेलूर येथील रामकृष्ण आश्रमात आहे. लोकांना मोक्षप्राप्तीसाठी मदत करणे, हे या मिशनचे मुख्य ध्येय आहे. याबरोबरच स्वामी विवेकानंद किंवा रामकृष्ण मठाची स्थापना झाली आहे.
हेही वाचा : Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला 'हे' पदार्थ करा भगवान शिवाला अर्पण, त्याशिवाय पूजा आहे अपूर्ण