ETV Bharat / bharat

Ramadan The Islamic Holy Month २०२३ : इस्लाम धर्मात आहे रमजानला खास महत्व: जाणून घ्या कसा करतात साजरा - रमजान या महिन्याला विशेष महत्व

मुस्लिम समाजात रमजान महिन्याला मोठे महत्व आहे. रमजान महिन्यात सकाळच्या सहेरीपासून ते रात्रीच्या अजानपर्यंत तब्बल १६ ते १८ तास नागरिक उपवास करतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज असते.

Ramadan The Islamic Holy Month २०२३
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 23, 2023, 1:45 PM IST

हैदराबाद : इस्लाम धर्मात रमजान या महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. हा अत्यंत पवित्रा महिना असल्याचे संबोधले जाते. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सकाळच्या सहेरीनंतर उपवास पकडतात तर रात्रीच्या अजाननंतर हा उपवास सोडला जातो. त्यामुळे रमजान महिन्यात नेमका कसा धरला जातो उपवास, काय आहे रमजान महिन्याचे महत्व याबाबत या लेखातून जाणून घेऊया.

का पकडला जातो उपवास : मुस्लिम धर्मातील १५ वर्षापुढील मुले आणि ९ वर्षावरील मुली रमजानचा उपवास पकडतात. त्यामुळे रमजान महिन्यात उपवास ठेवण्यामागे उपाशी असणे हे कारण नाही. तर उपवासामुळे शरीरातील सर्व भाग स्वच्छ होणे गरजेचे असल्याची भावना यामागे असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. माणसाच्या मनात वाईट विचार येतात. त्यातून मुक्तता होण्यासाठी रमजान महिन्यात उपवास ठेवले जातात. त्यासह जे नागरिक परहिस्थितीमुळे उपाशी असतो, त्यांच्याबाबतचाही विचार यावा म्हणूनही उपवास ठेवण्यात येत असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात.

काय आहे उपवासाचे महत्व : रमजान महिन्यात उपवासाला फार महत्व आहे. रमजान महिन्यात लहान मुलेही उपवास ठेवतात. मात्र त्यांच्यावर कोणतीही बळजबरी करण्यात येत नाही. आपले शरीर आणि मन स्वच्छ करण्यासाठी रमजान महिन्यात उपवास करण्यात येतात. या उपवासाच्या दिवसात दिवसभर कुराणाचे पठण करण्यात येते. त्यामुळे विचारशुद्धी होत असल्याचेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. त्यामुळे नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत रमजानचे उपवास करतात.

काय घ्यावी काळजी : रमजान महिना हा मुस्लिम धर्मीयांचा ९ वा महिना असून या महिन्यात वातावरण सारखे बदलत असते. त्यामुळे सारखी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या महिन्यात बाजारात खाद्यपदार्थाची रेलचेल असते. मात्र रमजान महिन्यात तब्बल १५ ते १८ तास उपवास करावा लागतो. त्यामुळे भर उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होण्याची भीती असते. त्यासाठी थंड पेयाचा आणि पदार्थाचा वापर करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. उकाडा वाढल्यामुळे रमजानचे उपवास करताना त्रास होतो, त्यामुळे काळजी घेण्यात यावी.

हेही वाचा - World Water Day 2023 : जल है तो जीवन है, जाणून घ्या काय आहे जल दिनाचा इतिहास आणि महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.