हैदराबाद : हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात. ही एकादशी दिवाळीच्या आधी येते. या वर्षी रमा एकादशीचे व्रत 09 नोव्हेंबर 2023, गुरुवार रोजी पाळले जाणार आहे. एकादशी तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. गुरुवार हा भगवान श्री हरी पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. शास्त्रानुसार जेव्हा एकादशी गुरुवारी येते तेव्हा तिचे महत्त्व आणखी वाढते.
- रमा एकादशीचे नाव कसे पडले : दिवाळीत लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते. असं मानलं जातं की देवी लक्ष्मीचं एक नाव रमा आहे आणि या एकादशीला श्री हरीसह लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. देवी लक्ष्मीचं नाव रमा असल्याने ती रमा एकादशी म्हणून ओळखली जाते. असं मानलं जातं की हे व्रत केल्यानं घरात लक्ष्मीचा वास होतो.
- रमा एकादशीचा शुभ मुहूर्त : एकादशी तिथी 08 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 08:23 वाजता सुरू झाली आहे आणि 09 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10:41 वाजता समाप्त होईल.
- रमा एकादशी व्रत सोडण्याची वेळ : रमा एकादशी व्रताचे पारण 10 नोव्हेंबर 2023 रोजी केले जाईल. उपवास सोडण्याची वेळ सकाळी 06:39 ते 08:49 अशी असेल.
- रमा एकादशीला दानाचे महत्त्व : रमा एकादशीच्या दिवशी दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेलं दान हजारो गायींच्या दानाएवढे असते, असं मानलं जातं. एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना मदत करावी.
एकादशी पूजा विधी :
- सकाळी लवकर उठून आंघोळ करा.
- घराच्या मंदिरात दिवा लावावा.
- भगवान विष्णूंना गंगाजलाने अभिषेक करा.
- भगवान विष्णूला फुल आणि तुळशीची पाने अर्पण करा.
- शक्य असल्यास या दिवशी व्रत ठेवावे.
- देवाची आरती करावी.
- देवाला अन्न अर्पण करा. ध्यानात ठेवा की केवळ पुण्यपूर्ण वस्तूच देवाला अर्पण केल्या जातात. भगवान विष्णूला अर्पण करताना तुळशीचा अवश्य समावेश करा. तुळशीशिवाय भगवान विष्णू अन्न ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
- या शुभ दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीचीही पूजा करा.
- या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे.
हेही वाचा :