ETV Bharat / bharat

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची आज जयंती,  जाणून घ्या त्यांच्याविषयी या गोष्टी!

तळागाळातून वरपर्यंत पोहचलेला एक दलित बिहार नेता अशी रामविलास पासवान यांची ओळख होती. आज 5 जुलै रोजी रामविलास पासवान यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. पाच दशकांपेक्षा जास्त संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे होता.

Ram Vilas Paswan
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान
author img

By

Published : Jul 5, 2021, 10:12 AM IST

पाटणा - आज 5 जुलै रोजी रामविलास पासवान यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. तळागाळातून वरपर्यंत पोहचलेला एक दलित बिहार नेता अशी रामविलास पासवान यांची ओळख होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. पासवान यांचे 8 ऑक्टोंबर 2020 ला निधन झाले. रामविलास पासवान हे देशातील अनुभवी नेत्यांपैकी एक होते. पाच दशकांपेक्षा जास्त संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे होता.

Ram Vilas Paswan
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याविषयी...

रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी खगडियातील दलित कुटुंबात झाला. त्यांनी बुंदेलखंड विद्यापीठ झांसी येथून एम.ए आणि पाटना विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले होते. 'मैं उस घर में दिया जलाने चला हूं, जहां सदियों से अंधेरा है' या घोषवाक्यातून राम विलास पासवान यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. पासवान यांचा राजकीय प्रवास 1960 च्या दशकात बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून सुरू झाला होता. 1969 ला बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पासवान निवडून आले होते.

1977 मध्ये पासवान सहाव्या लोकसभेत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 1982 च्या लोकसभा निवडणुकीत पासवान विजयी झाले. रामविलास पासवान यांनी 1983 मध्ये दलितांच्या कार्यासाठी दलित सेनेची स्थापना केली होती. 1989 मध्ये 9 व्या लोकसभेत ते तिसऱ्यांदा निवडून गेले होते. तर 1996 मध्ये त्यांनी 10 वी लोकसभाही जिंकली होती. जेडीयूपासून विभक्त झाल्यानंतर 2000 मध्ये त्यांनी लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली. त्यांच्या विजयाची घौडदौड सुरूच होती. बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेतही ते जिंकत गेले. ऑगस्ट 2010 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून ते निवडले गेले.

रामविलास पासवान यांच्याकडील मंत्रीपदे

  • 1989 मध्ये केंद्रीय कामगार मंत्री होते.
  • 1996 मध्ये रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1999 मध्ये संचारमंत्री होते.
  • 2002 मध्ये कोळसा मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
  • 2014 मध्ये अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री झाले.
  • 2014 पासून ऑक्टोंबर 2020 पर्यंत पासवान यांनी अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले.

लोक जनशक्ती पक्षात घमासान -

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर 'लोक जनशक्ती पार्टी' धुरा मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या हाती घेतली. सध्या पक्षात घमासान सुरू आहे. चिराग पासवानच्या काही निर्णयांमुळे एलजेपीमध्ये फूट पडली आहे. चिराग पासवान यांची 5 नोव्हेंबर 2019 रोजी एलजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. चिराग पासवान यांच्या नेतृत्वात एलजेपीने गेल्या वर्षी बिहार विधानसभा निवडणूक लढविली होती. परंतु पक्षाला केवळ एक जागा जिंकली. वडील रामविलास यांच्या अनुपस्थितीत आणि पक्षाध्यक्षपदी चिराग यांची ही पहिलीच कसोटी होती, ज्यामध्ये ते अपयशी ठरले. निवडणुकीत खराब कामगिरीमुळे एलजेपी नेते चिराग पासवान यांच्यावर नाराज आहेत. चिराग यांचे काका पशुपती पारस यांनी एलजेपी ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला आहे. त्यांच्या बाजूने पक्षाचे पाच खासदारही आले आहेत. विधानसभा निवडणुकीत एलजेपीच्या निकृष्ट कामगिरीमुळे पक्षाच्या नेत्यांमध्ये निषेधाची अग्नि पेटत होती, जे आता 'चिराग'समोर वादळ म्हणून उभी राहिलीय.

हेही वाचा - चिराग पासवान यांनी बंडखोर खासदारांची केली पक्षातून हकालपट्टी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.