सिरसा: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम (dera sacha sauda chief ram rahim) सध्या हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. राम रहीमने आपल्या कौटुंबिक आयडीमध्ये पत्नी हरजीत कौर किंवा आई नसीब कौर यांचे नाव नोंदवलेले नाही मात्र आयडीमध्ये हनीप्रीतचे नाव आहे. (honeypreet in ram rahim family id).
यूपीतील बागपत आश्रमातील वास्तवा दरम्यान बनवलेल्या राम रहीमच्या फॅमिली आयडीमध्ये (ram rahim family id) हनीप्रीतचे वर्णन राम रहीमची मुख्य शिष्या आणि धर्माची मुलगी असे करण्यात आले आहे. तसेच त्याने आपल्या आई-वडिलांच्या नावाच्या कॉलममध्ये शिष्य आणि शासक शाह सतनाम सिंह महाराज असे लिहिले आहे. तर हनीप्रीतच्या आई-वडिलाच्या नावाच्या कॉलममध्ये मुख्य शिष्य आणि धर्माची कन्या संत गुरमीत राम रहीम सिंग इंसा असे नोंदवले आहे.
राम रहीमचे वार्षिक उत्पन्न लाखात : या दस्तावेजा नुसार राम रहीम आणि हनीप्रीत यांचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांमध्ये आहे. या फॅमिली आयडीमध्ये राम रहीमचे वय 54 वर्षे आणि हनीप्रीतचे 41 वर्षे आहे. मात्र, डेरा व्यवस्थापन हनीप्रीतची मक्तेदारी नाकारत आहे. हनीप्रीतचे खरे नाव प्रियांका तनेजा असून ती फतेहाबादची आहे. तिने डेरा अनुयायी विश्वास गुप्तासोबत लग्न केले होते, मात्र वादानंतर विश्वासने हनीप्रीतपासून घटस्फोट घेतला.
पॅरोल दरम्यान अपडेट केले आधार कार्ड: 30 दिवसांच्या पॅरोल दरम्यान राम रहीमने बागपत आश्रमात त्यांचे आधार कार्ड देखील अपडेट केले होते. याआधी राम रहीमच्या आधारकार्डवर त्याच्या वडिलांचे नाव मगर सिंह होते. या आधार कार्डची प्रत डेरा अनुयायांच्या एका विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या फेथ वर्सेस व्हर्डिक पेजवरही अपलोड करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या वतीने असा दावा करण्यात आला आहे की, यापूर्वी डेरा मुखीने त्यांच्या आधार कार्डमध्ये शाह सतनाम धाम हा पत्ता लिहिला होता, जो आता बदलून शाह मस्तान, शाह सतनाम धाम करण्यात आला आहे. आधार कार्डचे शेवटचे अपडेट 22 जून रोजी करण्यात आले होते.
राम रहीमचे संपूर्ण कुटुंब परदेशात: राम रहीमचे संपूर्ण कुटुंब सध्या परदेशात स्थायिक आहे. राम रहीमच्या दोन मुली अमरप्रीत आणि चरणप्रीत कौर आणि मुलगा जसमीत कुटुंबासह लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र डेरा प्रमुखाची आई नसीब कौर आणि पत्नी हरजित कौर भारतातच राहणार आहेत. राम रहीमच्या दोन मुली अमरप्रीत आणि चरणप्रीत या आधीच लंडनला गेल्या होत्या. २६ सप्टेंबर रोजी मुलगा जसमीतही कुटुंबासह लंडनला गेला.