पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीला माँ दुर्गेचे नववे रूप माँ सिद्धिदात्रीची पूजा करण्याबरोबरच रामनवमीचा सणही साजरा केला जातो. असे मानले जाते की, या दिवशी अयोध्येतील राजा दशरथ यांच्या घरी भगवान श्रीरामाचा जन्म झाला होता. म्हणूनच नवमी तिथी ही 'भगवान श्रीरामाची जयंती' म्हणून साजरी केली जाते. या दिवशी नियमानुसार पूजा केली जाते. रामनवमीची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.
श्रीरामनवमी चे महत्व : श्री रामनवमी सण भारतात श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्रीरामाचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून भक्त ही शुभ तिथी रामनवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून पुण्यकार्यात सहभागी होतात.
श्रीरामनवमी 2023 मुहूर्त : हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी तिथी २९ मार्च २०२३ रोजी रात्री ९.०७ वाजता सुरू होईल आणि ३० मार्च २०२३ रोजी रात्री ११.३० वाजता संपेल. या दरम्यान रामनवमीच्या पूजेसाठी मध्यान्ह मुहूर्त सकाळी 11:17 ते दुपारी 01:46 पर्यंत म्हणजेच 2 तास 28 मिनिटांचा असेल.
तीन शुभ संयोग : यावेळी 30 मार्च रोजी रामनवमी उत्सवाच्या दिवशी 3 अतिशय शुभ संयोग घडत आहेत. रामनवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि गुरु पुष्य योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये केलेली उपासना आणि उपाय अतिशय शुभ फळ देतात. यश आणि समृद्धीसाठी रामनवमीच्या दिवशी पुढील उपाय करावे.
- रामनवमीच्या दिवशी रामचरितमानस, सुंदरकांडचे पठण करावे. असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यामुळे व्यक्तीचे सौभाग्य वाढते.
- धनप्राप्तीसाठी रामनवमीच्या दिवशी रामाष्टकांचे पठण करावे. त्याचबरोबर भगवान श्रीरामाची विधीपूर्वक पूजा केल्यानंतर चंदनाचा तिलक लावून राम स्तुती वाचा. त्यामुळे कामात यश मिळेल.
- घरामध्ये वास्तुदोष, नजर दोष, तंत्र-मंत्राचा अडथळा असेल तर, रामनवमीच्या दिवशी एका वाडग्यात गंगाजल घेऊन भगवान श्री रामाच्या रक्षण मंत्र 'ओम श्री ह्वेन क्लीं रामचंद्राय श्री नमः' चा किमान १०८ वेळा जप करावा. त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. सर्व प्रकारचे दोष दूर होतील.
- श्री रामाच्या जन्मावेळी सुंठ आणि धने पावडर एकत्र करुन तयार केलेला प्रसाद पुजेत ठेवावा. तसेच सगळ्यांनी घ्यावा, असे करने आरोग्यासाठी चांगले असते.
- यादिवशी घरी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावावे, असे केल्यास वातावरणातील सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.