ETV Bharat / bharat

तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत धडक देऊ; राकेश टिकैत यांचा इशारा

कृषी कायदे रद्द केले नाही. तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत धडक देऊ आणि संसदेला घेराव घालू, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्राला दिला. राजस्थानातील सीकरमध्ये शेतकऱ्यांच्या सभेला ते संबोधीत करत होते.

author img

By

Published : Feb 24, 2021, 4:48 PM IST

Updated : Feb 24, 2021, 6:42 PM IST

राकेश टिकैत
राकेश टिकैत

सीकर - गेल्या दोन महिन्यांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी आंदोलनाला आणखी जोर मिळावा, यासाठी शेतकरी नेते राकेश टिकैत देशभरात शेतकरी सभांना संबोधित करत आहेत. आज त्यांनी राजस्थानमधील सीकरमध्ये शेतकऱ्यांच्या सभेला संबोधित केले. कृषी कायदे रद्द केले नाही. तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत धडक देऊ आणि संसदेला घेराव घालू, असा इशारा त्यांनी केंद्राला दिला आहे.

राकेश टिकैत यांची सभा...

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमकुवत समजू नये. जर त्यांनी कृषी कायदे रद्द केले नाही. तर यावेळी शेतकरीही तेच आणि ट्रॅक्टरही तेच असतील. फक्त यावेळी आम्ही 4 लाख नाही. तर 40 लाख ट्रॅक्टरसह संसदेवर मार्च काढू, असे राकेश टिकैत म्हणाले. तसेच संसदेला घेरण्यासाठी लवकरच संयुक्त मोर्चा तारीख ठरवेल, असे टिकैत यांनी सांगितले.

यापूर्वी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा कट रचण्यात आला. शेतकऱ्यांचे तिरंग्यावर प्रेम आहे. मात्र, नेत्यांचे नाही. सरकारने कृषी कायदे रद्द नाही केले आणि एमएसपी लागू नाही केली, तर मोठ्या-मोठ्या कंपन्यांचे गोदाम उद्धवस्त करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

शेतकरी आंदोलन -

कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना ज्या कायद्यांवर आक्षेप असेल. त्या कायद्यातील तरतुदींचा उघडपणे विचार करण्यास सरकार तयार आहे, असे सरकारने म्हटलं आहे. तर तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. तिन्ही कायदे रद्द करावे. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Last Updated : Feb 24, 2021, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.