ETV Bharat / bharat

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश...राजस्थानच्या महसूल मंत्र्यांचे स्पष्ट संकेत

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर रणनीतीकार हे काँग्रेसशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा आहे.

प्रशांत किशोर
Rajsthan minister Harish Choudhary on Prashant Kishor
author img

By

Published : Jul 16, 2021, 3:50 PM IST

जयपूर - राजकीय क्षेत्रातील मोठी बातमी आहे. राजकारणातील रणनीतीकार म्हणून ओळख असलेले प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी नुकतेच राहुल गांधी व प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतलेल्या दिवशी राजस्थानचे महसूल मंत्री हरीश चौधरी (Harish Choudhary) दिल्लीमध्ये होते. त्यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. येत्या काळात प्रशांत किशोर महत्त्वाची जबाबदारी पार पडू शकतात, असे संकेत हरीश चौधरी यांनी दिले आहेत.

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

हेही वाचा-रोज कोण काय बोलतो, त्याला महत्त्व देण्याची गरज नाही - प्रफुल पटेल

हरीश चौधरी म्हणाले, की पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांची भेट घेण्याचा अर्थ प्रशांत किशोर हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. येत्या काळात प्रशांत किशोर हे काँग्रेसशी हातमिळवणी करू शकतात, असे संकेत आहेत.

हेही वाचा-मंत्री बच्चू कडूंनी 'त्या' आंतरजातीय विवाहाला दर्शविला पाठिंबा, म्हणाले...

राहुल गांधी यांच्या सूचनेप्रमाणे महसूल मंत्री हरीश चौधरी हे दिल्लीत गेले होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंह यांच्या वादाबाबत महसूल मंत्री हरीश चौधरी यांनी राहुल यांची भेट घेतली होती. हरीश चौधरी हे पंजाब राज्याचे 7 वर्षे काँग्रेसचे प्रभारी होते.

हेही वाचा-VIDEO : पाहा, तालिबानविषयी प्रश्न विचारताच कसे पळाले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची 13 जुलैला भेट घेतली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतली. आगामी पंजाबच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर हे काँग्रेससाठी काम करणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वीही प्रशांत किशोर यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी काम केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.