ETV Bharat / bharat

Accused Houses Demolished : लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणाऱ्या 8 जणांची घरे जमीनदोस्त, मध्य प्रदेशातील घटना

मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यात एका वरातीत डीजे वाजवल्याबद्दल दगडफेकीची घटना समोर आली आहे. आठवडाभरात जिल्ह्यातील ही दुसरी घटना आहे. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत वरातीतील तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे. यासोबतच बुलडोझर चालवून 8 आरोपींची घरे जमीनदोस्त करण्यात ( Accused Houses Demolished ) आली.

लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणाऱ्या 8 जणांची घरे जमीनदोस्त

author img

By

Published : May 19, 2022, 10:32 PM IST

राजगड- जीरापूरच्या एका गावात एका विशिष्ठ जातीच्या व्यक्तीच्या वरातीवर दगडफेक करणे उपद्रव्यांना महागात पडले आहे. प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपींची घरे पाडली. मंगळवारी रात्री उशिरा त्या वराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी 21 आरोपींची ओळख पटवली होती. यानंतर गुरुवारी (दि. 19 मे) ओळख पटलेल्या घरांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात आली. महसूल कर्मचारी, महापालिका कर्मचारी यांच्या उपस्थितीत मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोकलेन मशीनसह जेसीबी मशिनद्वारे 8 घरे जमीनदोस्त करण्यात ( Accused Houses Demolished ) आली.

लग्नाच्या वरातीवर दगडफेक करणाऱ्या 8 जणांची घरे जमीनदोस्त

काय आहे प्रकरण - जिरापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रभात गौड यांनी सांगितले की, राजगढ जिल्हा मुख्यालयापासून 38 किमी अंतरावर असलेल्या जिरापूर शहरात मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एकाची वरात एका मशिदीबाहेरून जात होती. तेव्हा काही समाजातील लोकांनी डीजे वाजवला. यावर आक्षेप घेतल्याने त्यांनी काही वेळ डीजे बंद केला. त्यानंतर मंदिराजवळ वरात पोहोचताच त्यांनी पुन्हा डीजे वाजवण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आधी याचा विरोध करण्यात आला त्यानंतर दगडफेक करण्यात आली.

पोलिसांनी 6 जणांना केली अटक - याबाबत वधूच्या वडिलांनी तक्रार दिली. यावरुन पोलिसांनी कलम 294, 336 आणि 506 कलमान्वये गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली. जिरापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रभात गौड यांनी सांगितले की, याप्रकरणी एससी-एसटी अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मंगळवारी रात्री आरोपींनी संगीत वाजवण्यास हरकत घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

धमकी दिली होती - अहवालात असे म्हटले आहे की, डीजेकमुळे त्याची झोप मोडत असल्याचे सांगत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये तीन जण जखमी झाले. तक्रारीनुसार, जेव्हा वधूकडील मंडळीही त्या ठिकाणी जमू लागली तेव्हा आरोपींनी त्यांना त्यांच्या परिसरात पुन्हा डीजे वाजवून त्यांची झोप उडवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली.

हेही वाचा - Truck Crushed 14 Laborer : भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १४ मजुरांना ट्रकने चिरडले, तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.