ETV Bharat / bharat

राजस्थानात कमळ फुललं! काँग्रेसचा दारुण पराभव; अनेक दिग्गजही पराभूत

Rajasthan Assembly Election 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपानं सत्ताधारी काँग्रेसचा दणदणीत पराभव केला. भाजपानं गेल्या वेळा पेक्षा ४२ जागा अधिक जिंकल्या आहेत.

Rajasthan Assembly Election 2023
Rajasthan Assembly Election 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:16 PM IST

Updated : Dec 3, 2023, 10:25 PM IST

हैदराबाद Rajasthan Assembly Election 2023 : दर ५ वर्षांनी सत्ताबदल होणारं राज्य म्हणजे राजस्थान. येथे गेल्या २० वर्षांपासून कोणत्याच पक्षाला सत्ता कायम राखता आलेली नाही. २०२३ ची निवडणुकही याला अपवाद नव्हती. या निवडणुकीत जनतेनं काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचत भारतीय जनता पार्टीच्या हातात राज्याची लगाम दिली.

भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं : जवळपास सर्व एक्झिट पोलनं राजस्थानमध्ये चुरशीच्या लढतीचा अंदाज वर्तवला होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपानं राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलं. राजस्थानमध्ये विधानसभेच्या २०० जागा आहेत. त्यापैकी १९९ जागांवर निवडणूक झाली. भाजपानं ११५ जागांवर विजय मिळवला असून, काँग्रेस ७० जागांवर विजयी ठरली. १४ जागा अन्यांच्या ताब्यात गेल्या आहेत. २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसनं काठावर बहुमत मिळवलं होतं. पक्षानं १०० जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपा ७३ जागांवर विजयी ठरली होती. तेव्हा अन्यांनी तब्बल २७ जागा जिंकल्या होत्या.

वसुंधरा राजे, अशोक गेहलोत विजयी : झालरापाटन येथून माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे रिंगणात होत्या. त्या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या, जी आघाडी त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. राजे यांनी काँग्रेसचे उमेदवार रामलाल चौहान यांचा ५३,१९३ मतांनी पराभव केला. राजे यांना एकूण १,३८,८३१ मते मिळाली तर काँग्रेसच्या उमेदवाराला ८५६३८ मतं मिळाली. याशिवाय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपचे महेंद्रसिंह राठोड यांचा २६,३९६ मतांनी पराभव केला. गेहलोत यांना ९६८६९ मते मिळाली, तर भाजपा उमेदवाराला ७०४४३ मतं मिळाली. गेल्या निवडणुकीपेक्षा गेहलोत यांचा विजयाचा आकडा कमी झाला आहे. २०१८ मध्ये त्यांनी ४५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

सचिन पायलट यांचा विजयी, अनेक दिग्गज पराभूत : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंक विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी अजित सिंह मेहता यांचा २९,४७५ मतांनी पराभव केला. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सचिन पायलट पिछाडीवर होते. मात्र नंतर त्यांनी आघाडी भरून काढली. या निवडणुकीत काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांचा पराभव झाला. विधानसभेचे सभापती सी.पी. जोशी यांचा नाथद्वार मतदारसंघातून पराभव झाला. तर गौरव वल्लभ उदयपूर मतदारसंघातून पराभूत झाले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवाराचा पराभव झाला आहे. राजेंद्र गुढा उदयपूरवाटी मतदारसंघातून पराभत झाले.

अशोक गेहलोत यांनी पराभव स्वीकारला : निकालानंतर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव स्वीकारला आहे. गेहलोत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटलं की, "आम्ही राजस्थानच्या जनतेनं दिलेला जनादेश नम्रपणे स्वीकारतो. हा प्रत्येकासाठी अनपेक्षित निकाल आहे. आमच्या योजना, कायदे आणि कल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे यशस्वी झालो नाही, हे या पराभवावरून दिसून येतं", असं ते म्हणाले. पराभवानंतर अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत नव्या सरकारचं अभिनंदन केलं आहे.

'खासदारां'ची रणनीती प्रभावी : भाजपान या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान खासदारांना तिकिट दिलं होतं. पक्षानं झोटवाडा विधानसभा मतदारसंघातून राज्यवर्धन सिंह राठोड, विद्याधर नगर येथून दिया कुमारी, तिजारा येथून बाबा बालक नाथ, सवाई माधोपूर येथून डॉ. किरोरीलाल मीन तर किशनगड येथून भगीरथ चौधरी यांना उमेदवारी दिली होती. बाबा बालक नाथ यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांचा पराभव केला, तर कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनीही विजय मिळवला आहे. सवाई माधोपूर मतदारसंघातून डॉ. किरोरीलाल मीना यांनी आपली जागा जिंकली, दिया कुमारी याही विधाधर नगरमधून विजयी झाल्या आहेत. मात्र किशनगड मतदारसंघातून भगीरथ चौधरी यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा :

  1. देशात भाजपाचं भगवं वादळ! वाचा किती राज्यात आहे पक्षाची सत्ता
  2. भाजपाचा असा नेता ज्यानं एकाच वेळी दिला विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्याला धोबीपछाड!
  3. तेलंगणात झळकले महाराष्ट्राचे माणिक'राव'; काँग्रेस विजयात 'ठाकरें'चं योगदान

Last Updated : Dec 3, 2023, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.