ETV Bharat / bharat

राजस्थान विधानसभा निवडणुकीत एकूण ७४.१३ टक्के मतदान : विवाहानंतर नवविवाहित वधूचं मतदान तर मतदानाकरिता लंडनहून आलं कुटुंब

Rajasthan Assembly Election : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी ७४.१३ टक्के मतदान झालं. मात्र मतदानादरम्यान एकापेक्षा एक अनोखी उदाहरणे समोर आली आहेत. कुठं नवविवाहित वधूनं बिगाईच्या आधी मतदान केलं. तर काही जण फक्त मतदानासाठी लंडनहून जयपूरला आले होते.

राजस्थान विधानसभा निवडणूक
राजस्थान विधानसभा निवडणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 8:23 AM IST

जयपूर Rajasthan Assembly Election : मतदान हा लोकशाहीचा सण साजरा करण्यासाठी राजस्थानमधील मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखविली. यावेळी दिवाळीला घरी येण्याऐवजी लंडनमधील एक अनिवासी भारतीय कुटुंब मतदानाच्या वेळी जयपूरला आलं. जेणेकरुन त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क वापरता येईल. तसंच शुक्रवारी लग्न झालेल्या वधूनं विवाह समारंभानंतरचे विधी पुढं ढकलून प्रथम मतदानाला प्राधान्य दिलंय.

नववधूनं बिदाईपूर्वी केलं मतदान : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीबाबत मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं. अशातच जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघात मतदान करण्यासाठी एक एनआरआय कुटुंब लंडनहून जयपूरला पोहोचलं. दुसरीकडं आमेर विधानसभेच्या जाजोलाई तलाई येथे मतदान करण्यासाठी नवविवाहित दिव्या उर्फ ​​अंजलीनं पाठवणीचा (बिदाई) कार्यक्रम पुढे ढकलून मताधिकाराचा वापर केलाय.

काय म्हणाली नवविवाहिता : मतदानानंतर नवविवाहित दिव्या उर्फ ​​अंजली म्हणाली, "माझं शुक्रवारी लग्न झालं. शनिवारी सकाळी निघण्यापूर्वी मी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आली. जेणेकरून परिसराचा विकास करणारा चांगला नेता निवडून यावा.'' अंजलीनं सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. त्याचवेळी तिचा पती जितेंद्र यानंही मतदानाला प्राधान्य देत आपल्या मतानंच चांगला नेता निवडला जातो, असं सांगितलं.

मतदानासाठी लंडनहून जयपूरला आलं कुटुंब : एका मतानंही सत्तापालट होते. त्या एका मताची किंमत लक्षात घेऊन मतदारांनी उत्साहात मतदान केलंय. मतदान करण्यासाठी लंडनहून जयपूरला पोहोचलेले मतदार कृष्णा गोयल म्हणाले, "ते प्रत्येक वेळी दिवाळीच्या सणाला घरी यायचे. पण यावेळी निवडणुकांमुळं त्यांनी आपला पूर्वनियोजित प्लॅन बदलला. मतदानाचा दिवशी ते लंडनहून जयपूरला पोहोचले. जेणेकरून त्यांना मतदान करता येईल. ते पुढे म्हणाले, "जेव्हा चांगला नेता निवडला जाईल, तेव्हाच परिसराचा विकास होईल., असा कृष्णा गोयल यांनी सांगितलं. ते लंडनमधील एका कंपनीत काम करतात.

199 जागांवर मतदान : राजस्थान विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 199 विधानसभा मतदारसंघातील 51,890 मतदान केंद्रांवर शनिवारी शांततेत आणि निष्पक्ष मतदान पार पडले. यावेळी राजस्थानमध्ये कोणाचे सरकार येणार याचं भविष्य आता ईटीव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक 2023 साठी शनिवारी 199 जागांवर चांगले मतदान झाले.

हेही वाचा :

  1. राजस्थानात 'राजे' येणार की 'परंपरा' बदलणार? विधानसभेच्या 199 जागांवर मतदान सुरु, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
  2. राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसच! गेहलोत यांना विश्वास, केरळ पॅटर्नचा उल्लेख करुन म्हणाले परंपरा मोडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.