अजमेर - प्रेमात पडल्यानंतर प्रेयसीला चंद्राची उपमा दिल्याचं तुम्ही चित्रपट, मालिका आणि कहाण्यांमधून अनेकदा ऐकलं असेल. बायको किंवा प्रेयसीसाठी चंद्र ताऱ्यांच्या शपथा घेणारेही तुम्ही पाहिले असतील. मात्र, पत्नीवरील प्रेमापोटी राजस्थानातील एका व्यक्तीनं चक्क चंद्रावर जमीन खरेदी केलीयं. लग्नाच्या आठव्या वाढदिवशी अजमेरच्या एका व्यक्तीनं पत्नीला गिफ्ट म्हणून चंद्रावर जमीन घेऊन दिलीयं.
अमेरिकेतील संस्थेकडून मिळवलं सर्टिफिकेट -
धर्मेंद्र अनिजा हे राजस्थानातील अजमेर येथील मूळचे निवासी असून सध्या ब्राझीलमध्ये राहतात. पत्नी सपनासाठी लग्नाच्या आठव्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून चंद्रावर तीन एकर जमीन खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. या जागेचे आणि नागरिकत्वाचे प्रमाणपत्रही त्यांनी मिळवले आहे. 'भूमी इंटनॅशनल लूनर लँड रजिस्ट्री' ही संस्था अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात असून चंद्रावर जमीन घेण्यासाठीची नोंदणी करते. या संस्थेत अनिजा यांनी जागेची नोंदणी केली आहे.
जागेचा पत्ताही प्रमाणपत्रात नमूद -
ही जमीन चंद्राच्या १४.३ अक्षवृत्त आणि ५.६ रेखावृत्तावर आहे. या जागेचा पत्ता 377 ,378 ट्रॅक पार्सल आणि ३७९ असा आहे. २४ डिसेंबरला एका कार्यक्रमात त्यांनी ही जमीन पत्नीला भेट दिली. लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापल्यानंतर चंद्रावरील जमिनीची कागदपत्रे त्यांनी पत्नीच्या हाती सोपवले. या कार्यक्रमाची थीमही चंद्राची ठेवली होती.
पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू
चंद्रावरील जमिनीचे कागदपत्रे दिल्यानंतर पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. धर्मेंद्र प्रधानने चंद्रावरील जमिनीची किंमत सांगण्यास नकार दिला आहे. भेटवस्तूचं कोणतही मूल्य नसते, असं त्यांनी सांगितलं. पतीच्या या अनोख्या गिफ्टनं बायको चांगलीच खुश आहे. ही जमीन भविष्यात विकूही शकतो. तसेच जर चंद्रावरील जमिनीवर संशोधन झालं तर त्याची रॉयलटीही मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.