नवी दिल्ली - छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील ‘धर्म संसद’ वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी ( Objectionable Remarks on Mahatma Gandhi ) छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक ( Kalicharan Maharaj Arrested ) केली आहे. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे.
-
#WATCH Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi
— ANI (@ANI) December 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video source: Police) pic.twitter.com/xP8oaQaR7G
">#WATCH Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi
— ANI (@ANI) December 30, 2021
(Video source: Police) pic.twitter.com/xP8oaQaR7G#WATCH Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi
— ANI (@ANI) December 30, 2021
(Video source: Police) pic.twitter.com/xP8oaQaR7G
कालीचरण काय म्हणाले?
धर्मसंसदेत कालीचरण यांनी नथुराम गोडसेच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. खासदार, आमदार, मंत्री आणि पंतप्रधान यांनी कट्टर हिंदुत्ववादी होण्याची गरज आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी जातिव्यवस्था रद्द करायला हवी. महात्मा गांधींनी काँग्रेसमध्ये घराणेशाही वाढवण्याचे काम केले. पंडित नेहरूंऐवजी सरदार पटेल यांच्याकडे सत्ता सोपवली असती तर देश अमेरिकेच्या पुढे गेला असता. 'देश सोने की चिडिया राहिला असता', असे कालीचरण महाराज म्हणाले. महात्मा गांधी हे काँग्रेसमधील घराणेशाहीचे जनक आहेत. ते राष्ट्रवादाचे जनक नाहीत, म्हणून ते त्यांना राष्ट्रपिता मानत नाही, असे ते म्हणाले. यानंतर पु्न्हा सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ टाकून कालीचरण महाराजांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. गांधींना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्याचा पश्चाताप नाही. मी गांधींचा तिरस्कार करतो. गांधींनी हिंदूंसाठी काय केले?, असे कालीचरण म्हणाले. यानंतर विविध स्तरामधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तसेच त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला.
कालीचरण महाराज हे महाराष्ट्रातल्या अकोल्याचे रहिवासी आहेत. अभिजीत धनंजय सराग हे त्यांचे खरे नाव आहे. ते भावसार समाजाचे असून त्यांच्या वडिलांचे मेडिकलचे दुकान आहे. स्थानिक तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहेत. त्याच्या आई-वडिलांनी कालीचरण यांना इंदूरला मावशीच्या घरी पाठवले. इंदूरमध्ये गेल्यानंतर त्याचा हिंदीशी जास्त संपर्क आला आणि ते हिंदी बोलायला लागले. भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर आश्रमात जाऊ लागले. तसेच 2017 मध्ये कालीचरण महाराज यांनी अकोला महापालिका निवडणुकीत नशीब आजमावले होते. मात्र, त्यांच्या हाती अपयश आले.