नवी दिल्ली : अशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे भारतात ( Indian Railway ) आहे. देशातल्या प्रत्येक भागात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. रेल्वेचे तिकिट दर दिवसाला वाढत चालले आहेत. अशातच तिकीट दरांमध्ये कपात करत भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
भारतीय रेल्वे : वाढत्या महागाईच्या काळात तिकीट दरांमध्ये कपात करत भारतीय रेल्वेने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. मुंबईत तर अनेकजणांसाठी रेल्वे महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. जगभरातही भारतीय रेल्वेकडे ( Indian Railway Booking ) मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. देशाच्या एका टोकापासून तुम्हाला दुसऱ्या टोकापर्यंत अगदी सहजपणे याच रेल्वेने पोहोचता येऊ शकते. अशा या रेल्वे विभागाने आता प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो सर्व ठिकाणी नाही. नॉर्थ रेल्वेकडून ही सुविधा प्रवाशांना पुरवण्यात आली आहे. ज्यामध्ये जवळपास 14 स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांचे ( Reduction in platform ticket prices ) दर कमी करण्यात आले आहेत. आता नव्या गणितांनुसार हे दर रुपये 10 इतके असतील. आधी हेच दर 50 रुपयांपर्यंत होते. दिवाळी आणि छठपूजा पाहता ही दरवाढ करण्यात आली होती अशी माहिती नॉर्थ रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोणत्या स्थानकांवर कमी दर : DCM कडून मिळालेल्या माहितीनुसार लखनऊ, वाराणासी, बाराबंकी, अयोध्या कँट, अयोध्या जंक्शन, अकबरपुर, शाहगंज, जौनपुर, सुल्तानपुर, रायबरेली, भदोई, प्रतापगढ़ आणि उन्नाऊ जंक्शन या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म तिकिटे कमी दरात विकली जाणार आहेत. त्यामुळे नातेवाईकांना सोडण्यासाठी चाललेल्यांना चांगली बातमी आहे.
कपात आधीच होणार होती : प्रत्यक्षात ठरल्याप्रमाणे प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर 6 नोव्हेंबरला कमी होणार होते. पण, तीन आधीच तिकीटांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवासी तिकीट नसतानाही जर प्लॅटफॉर्मवर यायचे असेल, तर प्रवाशांना प्लॅटफॉर्म तिकीट घ्यावे लागते. पण, दिवाळी आणि छठपूजा या निमित्तानं होणारी गर्दी पाहता प्लॅटफॉर्म तिकीटांचे हे दर वाढवण्यात आले होते. गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठीच दरांमध्ये हे बदल करण्यात आले होते. आता ते पूर्ववत करण्यात आले आहेत.
दक्षिण रेल्वेनेही घेतला असाच निर्णय : दक्षिण रेल्वेनेही ( Southern Railway Increase Ticket Price ) चेन्नही आणि उपनगरांतील 8 प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर 10 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत वाढवले होते. मात्र नॉर्थ रेल्वेच्या तुलनेत ही दर वाठ जास्त वेळ राहणार आहे. ही वाढीव दर वाढ 31 जानेवारी 2023 पर्यंक लागू असणार आहे. ज्या स्थानकांवर तिकीटांचे दर वाढले आहेत त्यामध्ये एमजीआर चेन्नई सेंट्रल, चेन्नई एग्मोर, तांबरम आणि काटपाडी यांचा समावेश आहे.