नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत रेल्वे बोर्डाचे सदस्य जया सिन्हा यांनी अपघाताबाबत माहिती दिली आहे. प्राथमिक तपासात सिग्नल यंत्रणेत बिघाड होता, असे आढळले आहे. फक्त कोरोमंडल एक्सप्रेसला अपघात झाला आहे. यशवंतपूर एक्सप्रेस आणि कोरोमंडल एक्सप्रेस या दोन्ही रेल्वेचा वेग अधिक होता.
एकाच रेल्वेचा झाला अपघात - कोरोमंडलचा वेग १२६ किमी प्रती तास होता. तर यशवंतपूर रेल्वेचा वेग प्रति तास १३० किमी प्रति तास होता. ग्रीन सिग्नल असल्याने दोन्ही लोको पायलटला रेल्वे वेगाने जाण्यास परवानगी होती. कोरोमंडल एक्सप्रेस ही लोखंड असलेल्या मालगाडीवर आदळल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे जया सिन्हा यांनी सांगितले. तसेच कोरोमंडळ रेल्वेला ग्रीन सिग्नल मिळालेला होता. त्यामुळे हाय स्पीडने हा अपघात झाला हा अंदाज चुकीचा आहे. तीन नाही तर एकाच रेल्वेचा अपघात झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे.
बालासोर येथे सुमारे १ हजार कामगारांकडून दुरुस्ती सुरू - देशातील सर्वाधिक भयानक असलेल्या रेल्वे अपघातानंतर विरोधी पक्षांकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे अश्विनी वैष्णव हे बालासोर येथील रेल्वेची सेवा पूर्ववत होण्यासाठी कामाकडे लक्ष देत आहेत. बालासोर येथे सुमारे १ हजार कामगार बोगी, मलबा हटविणे आदी कामासाठी कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री रेल्वे मंत्री अश्विनी यांच्या दुरध्वीवरून बालासोर येथील कामाबाबत आढावा जाणून घेतला आहे.
इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे अपघात घडला - केंद्रीय रेल्वे मंत्री माध्यमाशी बोलताना म्हणाले, की अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केली असून त्याचा तपास अहवाल आल्यानंतर सविस्तर कळू शकणार आहे. या घटनेचे कारण आणि जबाबदार कोण आहे, हे आम्ही ओळखले आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बदलामुळे अपघात घडला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भीषण अपघाताच्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अपघातात किमान २८८ जण ठार झाले आहेत.
हेही वाचा-
- Odisha Train Accident: रेल्वे अपघातावरुन राजकारण तापले, रणदीप सुरजेवालांनी पंतप्रधान मोदींना विचारले 9 प्रश्न
- Odisha Train Accident: रजेवर असलेल्या एनडीआरएफच्या जवानाने सर्वात प्रथम केले होते अलर्ट, लाईव्ह लोकेशनने पथकाला झाली मदत
- Odisha Train Accident: रेल्वे रुळावरील ट्रेनचे अवशेष हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; 90 ट्रेन रद्द