ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी सरकारी बंगला रिकामा करणार! म्हणाले, या आठवणी कधीच विसरणार नाही - राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस

लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटीस दिली आहे. त्यावर राहुल यांनी पत्र लिहून नोटीसला उत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात काही भावनिक गोष्टीही सांगितल्या आहेत.

Rahul Gandhi
Rahul Gandhi
author img

By

Published : Mar 28, 2023, 7:19 PM IST

Updated : Mar 28, 2023, 7:46 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर आता सरकारी बंगलाही सोडण्याच्या नोटिशीला उत्तर दिले आहे. लोकसभा सचिवालयातील एमएस शाखेच्या उपसचिवांना त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी दिलेल्या नोटीसला उत्तर देताना त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सरकारी बंगला रिकामा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Letter from Rahul Gandhi
राहुल गांधी यांचे पत्र

22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले : या बंगला सोडण्याबाबत राहुल गांधी आपल्या काही आठवणी सांगितल्या आहेत. या सरकारी बंगल्यात घालवलेल्या आनंददायी आठवणींचे आपण ऋणी राहू, असे ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे 12 तुघलक लेन येथील अधिकृत निवासस्थानही रिकामे करावे लागणार आहे. लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने त्यांना नोटीस पाठवून 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले आहे.

त्यांच्यासाठी एक बंगला रिकामा करीन : काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी लोकसभेच्या सचिवालयाच्या निर्देशाचा दाखला देत धमकावणे, धमकावण्याचे आणि अपमानित करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर टीका केली, राहुल गांधी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर दिल्लीत अधिकृत बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले. खरगे म्हणाले, राहुल गांधी यांना कमकुवत करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यांनी बंगला रिकामा केला तर ते त्यांच्या आईकडे राहतील किंवा ते माझ्याकडे येऊ शकतात आणि मी त्यांच्यासाठी एक बंगला रिकामा करीन असेही ते म्हणाले आहेत.

अशा वृत्तीचा निषेध : सरकारच्या धमकावण्याच्या, धमक्या देण्याच्या आणि अपमानित करण्याच्या वृत्तीचा मी निषेध करतो. विरोधकांशी वागण्याचा हा मार्ग नाही. कधी कधी तीन-चार महिने आम्ही बंगल्याशिवाय राहीलो आहोत. माझा बंगला गेला होता. तो मला सहा महिन्यांनंतर मिळाला होता अशी आठवणही त्यांनी सांगितली आहे. लोक इतरांना अपमानित करण्यासाठी असे करतात. मी अशा वृत्तीचा निषेध करतो असेही ते म्हणाले आहेत.

मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हा : संसद सदस्य म्हणून अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधींना दिल्लीच्या लुटियन्स झोनमधील तुघलक लेन येथे असलेला त्यांचा सरकारी बंगला रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियमांनुसार राहुल गांधींना 30 दिवसांच्या आत घर रिकामे करावे लागेल. गेल्या शुक्रवारी, राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर २४ तासांनी खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले. गुजरातच्या सुरत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना 2019 मधील कथित 'मोदी आडनाव' टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले.

हेही वाचा : Amritpal Singh in Delhi : अमृतपाल सिंग दिसला दिल्लीत, पगडी उतरवलेली, केस सोडले मोकळे; पाहा व्हिडिओ

Last Updated : Mar 28, 2023, 7:46 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.