ETV Bharat / bharat

जेव्हा नेता शब्द पाळतो! राहुल गांधींनी चिमुकल्याला पाठवले 'स्पोर्ट्स शूज' - अँटनी फेलिक्स

राहुल गांधी कन्याकुमारीमध्ये प्रचारासाठी गेले होते. तेव्हा राहुल गांधींची एका 12 वर्षीय मुलासोबत भेट झाली होती. त्या मुलाला त्यांनी शूज देण्याचे वचन दिले होते. दिलेल्या शब्दानुसार राहुल गांधींनी त्याला स्पोर्टस् शुज पाठवत वचनपूर्ती केली. आपले नवे शूज पाहून मात्र, चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.

राहुल गांधींनी चिमुकल्याला पाठवले 'स्पोर्ट्स शूज'

author img

By

Published : Mar 12, 2021, 8:41 AM IST

नवी दिल्ली - काँग्रेस नेता आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. आता ते पुन्हा एक विशेष गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. कन्याकुमारी येथे असताना राहुल गांधींची एका 12 वर्षीय मुलासोबत भेट झाली होती. त्या मुलाला त्यांनी शूज देण्याचे वचन दिले होते. दिलेल्या शब्दानुसार राहुल गांधींनी त्याला स्पोर्टस् शुज पाठवत वचनपूर्ती केली. राहुल गांधी यांनी शूज पाठवलेल्या मुलाचे नाव अँटनी फेलिक्स असे आहे.

Rahul Gandhi's surprise gift for a small boy
राहुल गांधींनी चिमुकल्याला पाठवले 'स्पोर्ट्स शूज'

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. तामिळनाडू राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी कन्याकुमारीमध्ये प्रचारासाठी गेले होते. तेव्हा चहा पिण्यासाठी एका स्टॉलवर गेले असताना त्यांची नजर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचे पोस्टर हातात घेऊन उभा असलेल्या एक 12 वर्षीय मुलावर गेली.

राहुल गांधी त्यांच्याजवळ गेले आणि विचारपूस केली. त्याला आवडी-निवडी विचारल्या. तेव्हा आपण 100 मीटर शर्यतीमधील धावपटू असल्याचे त्यांने राहुल गांधींना सांगितले. मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? असे राहुल गांधींनी त्याला विचारले. आपण अनवानी पायांनी धावत असल्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधींनी त्याला स्पोर्ट्स शूज पाठवून देतो, असे वचन दिले. दिलेल्या वचनानुसार राहुल गांधींनी त्याला स्पोर्टस शूज पाठवले आहेत. आपले नवे शूज पाहून मात्र, चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. राहुल गांधीच्या या कृत्याने नेटकऱ्यांची त्यांचे कौतूक केले आहे.

राहुल गांधी राजकीय भूमिकांपेक्षा इतर कारणांवरून जास्त चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मच्छिमांरासोबत समुद्रात उडी घेतल्यामुळे, तर विद्यार्थ्यांसोबत पुशअप्समुळे ते चर्चेत आले होते. तसेच राहुल गांधी यांनी बिर्याणी बनवल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. तामिळनाडूतील लोकप्रिय कुकिंग शोमध्ये राहुल गांधी शेफच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते.

हेही वाचा - 'भारत आता लोकशाही राष्ट्र राहिले नाही'; राहुल गांधींचे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.